नित्यानंद बाबाचा देश आणि अमेरिकेला चुना
आपल्या देशातले बरीच लोकं भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेली आहेत यात काही शंकाच नाही. या भोंदु बाबांच्या शर्यतीत बरीच नावं असली तरी 'नित्यानंद बाबा' नावाचा बाबा अलग लेव्हलचा खेळाडु आहे. बाकीचे खाली डबक्यात हातपाय मारतात पण मध्यंतरी या बाबाने डायरेक्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर चुना लावला आणि तो पण अमेरिकेसारख्या देशाला!! खालील ब्लॉगमध्ये आपण १)नित्यानंद बाबाचा इतिहास २)बाबाने चालु केलेला देश ३)मध्यंतरी गाजलेलं अमेरिकेच sister city प्रकरण पाहुया.. स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या. २०१० साली जेव्हा नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CI...