पोस्ट्स

वर्ल्डकप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा

इमेज
संपल.. मागच्या दिड एक महिन्यापासून संपूर्ण देशात जो क्रिकेट सण साजरा होत होता त्याला आज पुर्णविराम लागला..भारतीय संघ खरच भारी खेळला, एकदम संतुलित वाटणारा हा संघ हार्दिक पांड्या जरी बाहेर गेला तरी आपलं संतुलन न जाऊन देता खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उरलेल्या १० खेळाडुंनी आपला बेस्ट परफाॅर्मन्स दाखवला..देशातील १५० करोड लोकांना प्रत्येक सामन्यानंतर आनंदच आनंद दिला! वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत जादुई प्रवास करणारा भारत यंदाचा वर्ल्डकप मारणार अशी जणु गॅरंटीच होती. त्यात 'आपणच जिंकणार' हा विश्वास वाढवायला जुन्या थेअर्या चघळल्या जात होत्या ज्यात, १)२०११,२०१५,२०१९ ला वर्ल्डकप host करणारे देश जिंकले म्हणुन यावेळीही आपण जिंकणार. २)२०११,२०१५,२०१९ ला ज्या देशांनी रन चेज केले ते संघ जिंकले(भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विवादित) दुर्दैवाने भारताला यावेळी टाॅस जिंकता आला नाही आणि पहिली फलंदाजी करावी लागली. ३)२०११,२०१५ व २०१९ ला अंतिम सामन्यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांपैकी जो कर्णधार ट्राॅफीच्या उजव्या बाजुला उभारलाय तो संघ वर्ल्डकप जिंकलाय.यावेळी रोहित शर्मापण उजव्या...

भारत विरुद्ध न्युझीलंड (भारताचा २० वर्षांनी विजय)

इमेज
तर आज पण आपल्या संघाची बॅंक निफ्टी अर्थात रोहित हिटमॅन शर्मा याने जोरदार सुरूवात केली आणि आपल्या संघाचा Equity अर्थात विराट कोहलीने शेवट गोड केला.  रोहितला बॅंक निफ्टी म्हणण्यामागे कारण एव्हढच आहे की जस बॅंक निफ्टीची हालचाल बघायला मजा येते, तिच्याकडुन येणारा प्राॅफीट आपल्याला आकर्षित करतो पण मनात लाॅस होण्याची तेव्हढीच धाकधुक लागुन असते अगदी तसच रोहित शर्माला खेळताना जाणवतं 😍..त्याचे शाॅट सिलेक्शन, खेळण्यातली आक्रमकता आणि समोरच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याची मानसिकता ही तेव्हढीच आकर्षक असली तरी धोकादायक ही तेव्हढीच, बॅंक निफ्टीमध्येही नफा होत असताना ती कधी पलटेल आणि स्टाॅपलाॅस खाईल त्यातलाच हा प्रकार ..आणि आज या गोष्टीचा रोहितला पुन्हा एकदा फटका बसला. फक्त ४ धावांनी त्याने आपलं अर्धशतक गमावलं..मागच्या सामन्यात ४८ धावा आणि त्याआधी ८६ धावांवर बाद झालेला रोहित स्वताच्या वैयक्तिक 'माईलस्टोन' साठी खेळत नसला तरी रोहितचा चाहता म्हणुन असे काही झाले की मला कायम दुख होते. स्वतःपेक्षा संघासाठी खेळणारा रोहित पहिल्या १० षटकांत समोरच्या संघाचे कंबरडं आधीच मोडुन ठेवतो एव्हढं मात्र...