'LIC' कंपनीचा उगम, प्रवास आणि सद्यस्थिती
मित्रांनो, भारतात असा एकही माणुस सापडणार नाही ज्याला LIC बद्दल ठाऊक नसाव. एकेकाळी भारतीय विमा बाजारात 'monopoly' म्हणुन अधिराज्य गाजवणारी ही जीवनविमा कंपनी आज एव्हढी संकटात का सापडली आहे? खालील ब्लाॅगमध्ये आपण भारतात इन्शुरन्सची सुरूवात आणि LIC नेमकी कधी जन्माला आली ते पाहुया..शेवटी LIC ची सध्याची स्थिती काय आहे आणि स्थितीमागची कारणे पण समजुन घेऊया!! सुरुवातीला १)भारतात जीवनविम्याची सुरूवात कधी झाली व LIC चा जन्म २)LIC चा नेमका प्रवास ३)LIC ची सद्यस्थिती १) तुम्हाला तर माहितीचय की भारतात 'कर्ज' आणि 'इन्शुरन्स' या दोन गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.आजकाल बर्याच गोष्टींवर तुम्हाला इन्शुरन्स मिळु शकतो ज्यात दुचाकी,चारचाकी,मोबाईल,हेल्थ,लाईफ,घर तसेच मालमत्ता इ. येत.आपण आधी भारतातील इन्शुरन्सचा प्रवास जाणुन घेऊ आणि त्यानंतर LIC बद्दल जाणुन घेऊ. तस पाहिलं तर ज्यावेळी 'औद्योगिक क्रांती' झाली त्यावेळी इन्शुरन्स चालु झाला अस बरेच जण म्हणतात. भारतात इन्शुरन्स तसा नव्हताच, ब्रिटिशांनी तो आणला. साधारण १८१८ दरम्यान ब्रिटिशांनी कोलकातामध्ये 'Orien...