'LIC' कंपनीचा उगम, प्रवास आणि सद्यस्थिती
मित्रांनो,
भारतात असा एकही माणुस सापडणार नाही ज्याला LIC बद्दल ठाऊक नसाव. एकेकाळी भारतीय विमा बाजारात 'monopoly' म्हणुन अधिराज्य गाजवणारी ही जीवनविमा कंपनी आज एव्हढी संकटात का सापडली आहे? खालील ब्लाॅगमध्ये आपण भारतात इन्शुरन्सची सुरूवात आणि LIC नेमकी कधी जन्माला आली ते पाहुया..शेवटी LIC ची सध्याची स्थिती काय आहे आणि स्थितीमागची कारणे पण समजुन घेऊया!!
सुरुवातीला
१)भारतात जीवनविम्याची सुरूवात कधी झाली व LIC चा जन्म
२)LIC चा नेमका प्रवास
१) तुम्हाला तर माहितीचय की भारतात 'कर्ज' आणि 'इन्शुरन्स' या दोन गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.आजकाल बर्याच गोष्टींवर तुम्हाला इन्शुरन्स मिळु शकतो ज्यात दुचाकी,चारचाकी,मोबाईल,हेल्थ,लाईफ,घर तसेच मालमत्ता इ. येत.आपण आधी भारतातील इन्शुरन्सचा प्रवास जाणुन घेऊ आणि त्यानंतर LIC बद्दल जाणुन घेऊ.
तस पाहिलं तर ज्यावेळी 'औद्योगिक क्रांती' झाली त्यावेळी इन्शुरन्स चालु झाला अस बरेच जण म्हणतात.
भारतात इन्शुरन्स तसा नव्हताच, ब्रिटिशांनी तो आणला. साधारण १८१८ दरम्यान ब्रिटिशांनी कोलकातामध्ये 'Oriental Insurance' या विमा कंपनीची एक शाखा उघडली. सुरूवातीला या कंपनीत फक्त ब्रिटिशांनाच इन्शुरन्स काढण्याची मुभा होती.
त्यावेळी कोलकातामध्ये 'बाबु मोतीलाल सिल' नावाचे मोठे व्यापारी होते ज्यांचा बराच दबदबा होता. मोतीलालजींमुळे इंग्रजांनी भारतीयांनाही इन्शुरन्स काढण्याची परवानगी दिली पण इंग्रजांनी आपल्याकडुन खुप मोठा 'विमा हफ्ता' आकारला.पुढे १८७० मध्ये 'Bombay Mutual Life Insurance Society' ने पहिल्या इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली आणि मग भारतीयांसाठी विमा काढणे परवडण्यासारखे झाले.
भारतात साधारण १९१२ पर्यंत इन्शुरन्स कंपनीसाठी कोणत्याही प्रकारचा कायदा अस्तित्वात नव्हता पण विषय असा झाला की १८७० मध्ये भारतीयांसाठी चालु झालेल्या विमा कंपनीमुळे बर्याच भारतीयांनी विमा काढायला चालु केले होते. यामुळे १९१२ रोजी 'Indian Life Assurance Company Act' लागु करण्यात आला. या कायद्यानुसार भारतातल्या कंपन्यांना त्यांचे बाजार मुल्य आणि ते आखत असलेल्या विम्या हप्त्यांची नोंद करणे बंधनकारक करण्यात आल.
२० व्या शतकात इन्शुरन्सने जोम धरायला चालु केले होते.एकुण २२ करोड बाजारमुल्य असणार्या ४४ कंपन्यांवरून १९३८ पर्यंत २९८ करोड बाजारमुल्य असणार्या १७६ कंपन्या झाल्या!!
आता लक्षात घ्या जर एव्हढी मोठी उलाढाल होत असेल तर गप बसतील ते ब्रिटिश कुठले..त्यांनी १९३८ ला लगेच 'Insurance Act' आणला ज्याच्या अंतर्गत 'Life' आणि 'non life' इन्शुरन्सला पहिल्यांदाच जिल्हा आणि राज्याच्या आधिपत्याखाली आणलं.
पुढे जाऊन भारतात इन्शुरन्स कंपन्यांचे 'राष्ट्रीयकरण' करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली. बरेच लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. १९४४ साली 'Insurance Ammendment Act' देखील आणण्याचा प्रयत्न करण्यात आला पण प्रत्येकवेळी हा प्रयत्न असफल ठरला.शेवटी अनेक प्रयत्नांनंतर १९ जानेवारी, १९५६ ला इन्शुरन्स सेक्टरचे राष्ट्रीयकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये १५४ भारतीय कंपन्या, १६ भारताबाहेरील कंपन्या आणि ७५
Provident funds (भविष्य निर्वाह निधी, ज्यालाच आपण PF म्हणुन ओळखतो) यांना एकत्र केले. १९ जुन, १९५६ रोजी सरकारने 'The Life Insurance Corporation Act' मंजुर केला आणि १ सप्टेंबर, १९५६ ला इन्शुरन्स सेक्टरची राष्ट्रीयकरण प्रक्रिया पुर्ण होऊन 'LIC' जन्माला आली..
२)आता LIC चा प्रवास जाणुन घेऊया.
इन्शुरन्स सेक्टर ला किफायतशीर करणे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे, जास्तीत जास्त लोकांनी इन्शुरन्स घेतला पाहिजे यासाठी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी LIC चे राष्ट्रीयकरण केले. त्यावेळी ज्या सेक्टरचा प्रभाव 'गरिब' जनतेवर पडतो त्या सेक्टर्सचे राष्ट्रीयकरण करण्याचा धडाका नेहरूजींनी लावला होता. यामुळेच LIC ने पुढील ४० वर्ष भारतीय बाजारावर राज्य केले व भरपुर विस्तार करून घेतला..थोडक्यात इन्शुरन्स सेक्टरमधली 'Monopoly' म्हणुन LIC उदयाला आली.
LIC ही संपूर्णपणे भारतीय सरकारच्या अधिपत्याखाली येणारी कंपनी असुन LIC वर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा कंट्रोल आहे. जवळपास २९ करोड पाॅलिसीधारक आणि ४५.७ ट्रिलियन डाॅलर्स एव्हढा मोठा पसारा असणारी LIC कंपनी प्रतिष्ठेच्या फाॅर्च्युन ५०० यादीमध्ये ९८ क्रमांकावर विराजमान आहे!!
६४% मार्केट शेअर असणारी ही कंपनी साऊथ आशिया मधील सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. जर आपण LIC च्या मार्केट शेअरची तुलना बाकीच्या देशांसोबत केली तर आपल्याला या कंपनीच्या पसार्याबद्दल अंदाज येईल..
*चीनमधील Ping An Insurance:- २१.३% मार्केट शेअर
*जपानमधील Nippon Life Insurance:-१६.२% मार्केट शेअर
*साऊथ कोरियामधील Samsung Life Insurance:-१४.८% मार्केट शेअर
एव्हढच नाही तर LIC अमेरिका आणि युरोपमधील प्रतिष्ठीत इन्शुरन्स कंपन्यांपेक्षा खुप पुढे आहे त्यात
अमेरिकेतील 'Northwestern Mutual Life Insurance ' तर युरोपमधील 'Aviva PLC' येतात.
पण एव्हढा मोठा मार्केट शेअर असुनही LIC चा भारतात Insurance Penetration हा फक्त ४.१% आहे(थोडक्यात ही टक्केवारी जेव्हढी कमी तेव्हढी इन्शुरन्स कंपनी कमजोर) जे की ग्लोबल अव्हेरेज(७%) पेक्षा बराच कमीय..
२०२१ साली भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी LIC चा IPO आणणार असल्याची घोषणा केली आणि या बातमीने बाजारात अक्षरशः आग लावली..जो तो या IPO बद्दल बोलत होता, खुप ऐतिहासिक होईल..ज्याला मिळेल त्याच नशीबच उघडेल! अरे हा तर 'Aramco' कंपनीच्या ऐतिहासिक IPO ला पण टक्कर देईल इ...सरकारने आपल्याजवळचे ३.५% शेअर विक्रिला काढले आणि IPO ला apply करण्यासाठी ३ दिवसांची विंडो ठेवण्यात आली. दुर्दैवाने IPO फक्त ३ पटींनी subscribe झाला. १७ मे, २०२२ रोजी listing झाली आणि listing च्या दिवशी LIC चे बाजारमूल्य जवळपास ८% नी कोसळले!!!!
८% सांगायचेच झाले तर कंपनीला listing दिवशी ४६,५०० करोड रूपयांचा फटका बसला..एव्हढ्या मोठ्या धक्क्यातून कंपनी आणखी सावरलेली नाहीय..
लिस्टिंगच्या दिवशी मी पाहत होतो, कंपनीच्या शेअरने जवळपास ९४० रूपये प्रति शेअर उच्चांक गाठला खरा पण त्यानंतर शेअरला जबरदस्त घळघळ लागली आणि अलिकडेच कंपनीने ५३० रूपयांचा निच्चांक गाठला होता!!
LIC चा CAGR (Compound Annual Growth Rate) ज्या रेटमुळे कंपनीचे स्वास्थ्य समजण्यास मदत होते तो CAGR ही ८.२% एव्हढाच आहे. याच ठिकाणी कंपनीचे प्रतिस्पर्धी असणार्या दुसर्यांचे CAGR पाहिले तर आपल्याला लक्षात येईल.
*SBI Life :- २५.६%
*HDFC Life :- १७.९%
*MAX Life insurance :- १५%
*ICICI Prudential :- ९.७%
३)LIC ची सद्यस्थिती:-
ज्या कंपनीची एकुण मालमत्ता ही 'पाकिस्तान'च्या GDP पेक्षा जास्त होती आणि ४० वर्ष भारताच्या इन्शुरन्स बाजारात 'दादा' कंपनी म्हणुन गाजणार्या LIC सोबत नेमकं अस काय घडल ज्याने तिच रूपांतर पांढर्या हत्तीमध्ये झाले..
२००० साली अटलबिहारी वाजपेयी सरकारने ठराविक नियम बदलले आणि भारतीय बाजारात 'प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या'नी शिरकाव केला. प्रायव्हेट कंपन्यांसोबत नवनवीन बिजनेस माॅडेल आणि आयडीया आल्या. नवीन पाॅलिसी व आकर्षक योजना आल्या..
मित्रांनो,
*खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्यापैकी कोणाला LIC agent बद्दल माहिती असेल. ९० च्या दशकातल्या पोरा पोरिंना हे एजंट नक्कीच माहिती असणारयत जे घरोघरी जायचे आणि LIC बद्दल माहिती द्यायचे. लोकांना वेगवेगळे प्लॅन्स समजाऊन सांगायचे..ही योजना घेतली तर असा फायदा आहे, तीन/सहा/वर्षाचा हप्ता घेऊ शकता, इतके भरले तर इतके मिळतील वगैरे वगैरे..LIC ची ताकद म्हणजे त्यांचे एजेंट्स ज्यांना LIC चांगलच कमिशन द्यायचे.
आज जर तुम्ही आकडे पाहिले तर २००५ साली ९.८ लाख एजेंट असणार्या LIC कडे आज २०२३ साली ११.४ लाखच एजेंट आहेत आणि नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की ३० वर्षांपेक्षा कमी वय असणारे जवळपास १५% च एजेंट आहेत..
याच्यावरून आपल्याला लक्षात येत की तरूण वर्गाला LIC एजेंट म्हणुन काम करण्यात तेव्हढा रस राहिलेला नाहीय. एक गोष्ट लक्षात घ्या की LIC चा आजपण ९०% प्रसार हा एजेंट मार्फत होतो पण आजच्या पिढीला प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आवडत आहेत याच्यामागे मुख्य कारण हे की त्या प्रायव्हेट कंपन्या 'बॅंकिंग'ची सुविधासुद्धा पुरवतात. म्हणजे आजच्या पिढीला इन्शुरन्समध्ये काम करायचे नसेल तर त्याच कंपनीच्या बॅंकिंग क्षेत्रात उतरतात पण LIC च अस काहीच नाहीय..ती फक्त इन्शुरन्स देणारी एक कंपनी आहे.
*दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांनी online वर जास्त जोर दिलाय तर LIC नेमकं तिथेच मार खात!
LIC च्या Website वरून पाॅलिसी खपण्याचे प्रमाण फक्त ०.६१% आहे तर प्रायव्हेट कंपन्यांचे २.३०%..
बॅंकांकडुन LIC ला नवीन customer मिळण्याचे प्रमाण आहे ३% तिथेच प्रायव्हेट कंपन्यांना बॅंकांकडुन ५८% एव्हढ्या मोठ्या प्रमाणात customers मिळतात..
*LIC कडुन मिळणार्या ऑफर्स या प्रायव्हेट कंपन्यांकडुन मिळणार्या ऑफर्सपेक्षा खुप कमी आहेत. आजकालच्या पिढ्या कंपन्यांची तुलना ऑफर्सवरून करतात, कोणाकडुन चांगली ऑफर मिळतेय किंवा कोण चांगला परतावा देतय अशी तुलना करून लोकं पैसे टाकतात..
*LIC सरकारच्या अखत्यारीतील कंपनी असल्याने कंपनीतील बराच पैसा सरकार गुंतवणूकीसाठी वापरत असत. समजा एखाद्यावेळी ही गुंतवणूक फसली तर त्याचा परिणाम कंपनीच्या समभागावर दिसतो आणि लोकांची विश्वासाहर्ता कमकुवत व्हायला चालु होते..
ज्यावेळी 'हिंडनबर्ग' रिपोर्ट आला तेव्हा अदाणीचे समभाग जोरदार कोसळले. तुमच्या माहितीसाठी म्हणुन सांगतो LIC ने अदाणी इंटरप्राइजेसमध्ये ४.२३% गुंतवणूक केली आहे. तसेच LIC ने अदाणी पोर्ट्स, अदाणी गॅस, अदाणी ट्रान्समिशन इ. अदाणी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून ठेवलेली आहे. जर अदाणीचे समभाग कोसळले तर LIC ला ही त्याचा फटका बसणार!
LIC ने कात टाकावी आणि नवीन पिढीला नेमकं काय पाहिजे याचा अभ्यास करून स्वतःला बदलाव! एव्हढी मोठी Giant company अश्या परिस्थितीत पाहायला खुप विचित्र वाटतय..
ब्लाॅग वाचुन झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया कळवा,शेअर करा आणि मला ट्विटरवर फोलोव करायला विसरू नका mrutyyunjay वसुसेन
सोर्स:-स्टडीआयक्यु, गुगल, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदु
टिप्पण्या
LIC आणि इतर विमा कंपन्या यांच्या Claim Approval Percentage आणि Claim Rejection Percentage याची आकडेवारी मिळाली असती तर चांगले झाले असते. कारण विमा काढण्यात मुख्य उद्देश कुटुंबाला परतावा मिळणे हा असतो.
1)Max Life 99.34%
2)Bharti Axa Life 99.09%
2)Exide Life 99.09%
3)Aegon Life 99.03%
4)Bajaj Allianz 99.02%
5)Kotak Life 98.82%
6)LIC 98.74%