भारत विरुद्ध न्युझीलंड (भारताचा २० वर्षांनी विजय)
तर आज पण आपल्या संघाची बॅंक निफ्टी अर्थात रोहित हिटमॅन शर्मा याने जोरदार सुरूवात केली आणि आपल्या संघाचा Equity अर्थात विराट कोहलीने शेवट गोड केला. रोहितला बॅंक निफ्टी म्हणण्यामागे कारण एव्हढच आहे की जस बॅंक निफ्टीची हालचाल बघायला मजा येते, तिच्याकडुन येणारा प्राॅफीट आपल्याला आकर्षित करतो पण मनात लाॅस होण्याची तेव्हढीच धाकधुक लागुन असते अगदी तसच रोहित शर्माला खेळताना जाणवतं 😍..त्याचे शाॅट सिलेक्शन, खेळण्यातली आक्रमकता आणि समोरच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याची मानसिकता ही तेव्हढीच आकर्षक असली तरी धोकादायक ही तेव्हढीच, बॅंक निफ्टीमध्येही नफा होत असताना ती कधी पलटेल आणि स्टाॅपलाॅस खाईल त्यातलाच हा प्रकार ..आणि आज या गोष्टीचा रोहितला पुन्हा एकदा फटका बसला. फक्त ४ धावांनी त्याने आपलं अर्धशतक गमावलं..मागच्या सामन्यात ४८ धावा आणि त्याआधी ८६ धावांवर बाद झालेला रोहित स्वताच्या वैयक्तिक 'माईलस्टोन' साठी खेळत नसला तरी रोहितचा चाहता म्हणुन असे काही झाले की मला कायम दुख होते. स्वतःपेक्षा संघासाठी खेळणारा रोहित पहिल्या १० षटकांत समोरच्या संघाचे कंबरडं आधीच मोडुन ठेवतो एव्हढं मात्र...