भारत विरुद्ध न्युझीलंड (भारताचा २० वर्षांनी विजय)
तर आज पण आपल्या संघाची बॅंक निफ्टी अर्थात रोहित हिटमॅन शर्मा याने जोरदार सुरूवात केली आणि आपल्या संघाचा Equity अर्थात विराट कोहलीने शेवट गोड केला.
रोहितला बॅंक निफ्टी म्हणण्यामागे कारण एव्हढच आहे की जस बॅंक निफ्टीची हालचाल बघायला मजा येते, तिच्याकडुन येणारा प्राॅफीट आपल्याला आकर्षित करतो पण मनात लाॅस होण्याची तेव्हढीच धाकधुक लागुन असते अगदी तसच रोहित शर्माला खेळताना जाणवतं 😍..त्याचे शाॅट सिलेक्शन, खेळण्यातली आक्रमकता आणि समोरच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याची मानसिकता ही तेव्हढीच आकर्षक असली तरी धोकादायक ही तेव्हढीच, बॅंक निफ्टीमध्येही नफा होत असताना ती कधी पलटेल आणि स्टाॅपलाॅस खाईल त्यातलाच हा प्रकार ..आणि आज या गोष्टीचा रोहितला पुन्हा एकदा फटका बसला. फक्त ४ धावांनी त्याने आपलं अर्धशतक गमावलं..मागच्या सामन्यात ४८ धावा आणि त्याआधी ८६ धावांवर बाद झालेला रोहित स्वताच्या वैयक्तिक 'माईलस्टोन' साठी खेळत नसला तरी रोहितचा चाहता म्हणुन असे काही झाले की मला कायम दुख होते. स्वतःपेक्षा संघासाठी खेळणारा रोहित पहिल्या १० षटकांत समोरच्या संघाचे कंबरडं आधीच मोडुन ठेवतो एव्हढं मात्र नक्की..जोडीला गीलची शानदार फलंदाजी आहेच आहे! आज लोकि फर्ग्युसनने आपल्या दोन्ही ओपनर्सला माघारी पाठवले.. माघारी कुठले, ही दोघं स्वताच्या हातानी माघारी गेले.
त्यानंतर आला आपला विराट कोहली(equity).. विराटला equity म्हणण्यामागे कारण असे की जसे equity रुपयाला रुपया बांधत जाते, जास्तीत जास्त अभ्यास करून कमीत कमी नुकसान कस होईल याचे मार्ग शोधते अगदी तसेच विराटची खेळी वाटते. अजिबात चलबिचल न होता, मोठ्या फटक्यांपेक्षा एक दोन धावांचे जाळे विणत विणत आपली खेळी बांधण्यावर विश्वास ठेवणारा विराट मागच्या दोन सामन्यांपासुन ट्रेंडिंग ला आहे. पुण्यातल्या बांगलादेश विरुद्ध सामन्यात त्याने ज्याप्रकारे शतक पुर्ण केले त्यावर बरीच चर्चा झाली.. आज न्युझीलंडविरूद्धही त्याने तसच काहीतरी करण्याच्या प्रयत्न केला. जिंकायला १९ धावा आणि विराटला शतकालाही १९ च धावा लागणार होत्या. तेव्हापासून विराटने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्या खेळीलाही बरेच लोंक 'selfish knock' म्हणत आहेत तर बरेच जण सपोर्ट करत आहेत.....शेवटी ५ धावा आणि विराटला शतक करायलाही ५ च धावा हव्या असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला..पण तोपर्यंत त्याने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणुन ठेवले होते. Modern chase master (धावांचा पाठलाग करणारा) म्हणुन ओळखल्या जाणार्या विराटचा रेकाॅर्ड पाहता चेजींगच्या एकुण ३३ एकदिवसीय सामन्यात विराट कोहली चेज करून नाबाद राहिला असेल तर भारताने ३३ पैकी ३२ सामने जिंकले आहेत!! तर आज विराटने शेवटचा काही शाॅट सोडले तर जवळपास सगळे शाॅट बाॅल मैदानाला चिकटुन जाईल अश्या प्रकारे मारले आहेत..म्हणजेच minimum risk maximum output 💯
बाकी श्रेयस अय्यरच्या डोस्क्यात कधी प्रकाश पडणार आहे देवालाच माहिती..गल्लीतल्या बारक्या पोरालापण माहिती झालय की अय्यरला शाॅर्ट बाॅल टाकला की तो हमखास आऊट होतो.आजपण तसच झाल!!
नाचगाणं करण्यापेक्षा आणि त्या चहलचं टेंशन वाढवण्यापेक्षा हिटमॅनकडुन 'पुल शाॅट' मारायच्या टीप्स घ्यायला पाहिजे भावाने 🫣😜
पुढे के एलने विराटला खुप भारी साथ दिली आणि मौल्यवान धावांची जोडणी केली. कमनशीबी के एल सॅंटनरच्या चेंडुवर LBW झाला..
हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे सुर्यकुमार यादव तर शार्दुल ठाकुर च्या जागी महंमद शामीला संघात स्थान मिळाले. सुर्यकुमारने कव्हरकडे जोरदार शाॅट लगावला आणि तिथल्या क्षेत्ररक्षकाने त्यापेक्षा जोरदार क्षेत्ररक्षण करून बाॅल अडवला. सुर्याने एव्हढ्या जोरात मारलेला बाॅल अडवुन तो थ्रो टाकेपर्यंत नाॅन स्ट्राईकर असणारा विराट सहज पोचला असता खरा पण या दोघांमधी एक धाव काढण्याच्या नादात 'नाही होय, होय नाही' झालं आणि दुर्दैवाने सुर्यकुमार धावबाद झाला..सुर्याची बॅट तळपता तळपता राहिली.
मग आले आपले इतर वेळी थंड असणारे पण ICC tournament ला आग ओकणारे 'सर रविंद्र जाडेजा!'
या माणसाचं कौतुक कराव तेव्हढ कमीच कारण बाकी कुठलीही सिरीज, साखळी सामने इ. काहीही असुद्या..तिथे जाडेजा सुमार प्रदर्शन करतो पण ICC tournament म्हणल्यावर कात टाकल्यासारखं तो खेळतो. मग ते चेंडुने योगदान असो, क्षेत्ररक्षणातली चपळाई असो किंवा फलंदाजी असो..सगळीकडे अव्वल दर्जाचा खेळ 🔥
आज शुभमन गीलचा ३८ सामन्यात २००० धावांचा(सगळ्यात कमी सामने) रेकाॅर्ड झाला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा ४० सामन्यात २००० धावांचा रेकाॅर्ड मोडला. तर रोहित शर्माने एका वर्षात ५०+ षटकार मारले..
गोलंदाजांबद्दल काय लिहाव 😍
हार्दिक पांड्या नसल्याने भारताकडे ५ गोलंदाज होते. त्यात बुमराह, शामी, सिराज, जाडेजा आणि कुलदीप..
सुरूवातीच्या १० षटकात बुमराह आणि सिराजने आपल्या गोलंदाजीची जादु दाखवली. पण या सगळ्यांमध्ये छाप टाकली ती म्हणजे मोहंमद शामीने!!
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध २०१९ साली हॅट्ट्रिक घेतलेला शामी आज पहिला सामना खेळत होता आणि त्याने ५ विकेट्स घेतल्या..एव्हढच नाही तर त्याला हॅट्ट्रिकचा चान्सदेखील तयार झाला होता पण थोडक्यात हुकला!
एकदा मिळालेल्या 'संधीचं सोनं करण' म्हणजे नेमकं काय हे शामीच्या प्रदर्शनाकडे बघुन समजत..ज्यावेळी न्युझीलंडची फलंदाजी बघुन वाटत होत की ३००+ धावा जातील, जिथे शेवटच्या १० षटकांत १००+ धावा काढल्या जातात तिथे आपल्या गोलंदाजांनी खत्तरनाक गोलंदाजी करत फक्त ५४ धावा दिल्या..
Team work is a dream work म्हणतात ते हेच!
फक्त क्षेत्ररक्षण खुप ढिसाळ झालं..अपेक्षा करतो की पुढच्यावेळी यात पुन्हा चुका होणार नाहीत!!
ब्लाॅग कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि नवनवीन लिखाण वाचण्यासाठी मला ट्विटरवर फोलोव करा @mrutyyunjay वसुसेन
टिप्पण्या
तुमचं लिखाण म्हणजे.. वाचकांसाठी एक पर्वणीच..!!
बाकी रोहीत शर्मा ने बँक निफ्टी मधून थोड दर equity कडे पण लक्ष द्यावे..💪
तुमचं लिखाण म्हणजे.. वाचकांसाठी एक पर्वणीच..!!
बाकी रोहीत शर्मा ने बँक निफ्टी मधून थोड दर equity कडे पण लक्ष द्यावे..💪