तेंडल्या माऊंट एव्हरेस्ट एव्हढा
मला तर विशेष सचिन तेंडुलकरचं वाटत राव!
एक गोष्ट लक्षात घ्या..सुमार उंचीचा असणारा तेंडल्या ग्राऊंडवर हिमालयासारखा उत्तुंग होता
अस का? 💪🔥👇
अफगाणिस्तान भारत सामन्याचं बघा..
रोहित शर्माने शतकं मारलं आणि सचिनचा वर्ल्डकपमध्ये असणार्या 6 शतकांचा रेकाॅर्ड मोडला तर सामन्याच्याशेवटी विराट कोहलीने अर्धशतकं मारलं आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना 50+ धावा मारण्याचा सचिन तेंडुलकरच्या 45 सामन्यांचा रेकाॅर्ड मोडुन टाकला.
इकडे ग्राऊंडवर तुम्ही कामगिरी करा आणि तिकडे सचिनचे रेकाॅर्डच्या पुस्तकातुन एक एक रेकॉर्ड जगासमोर यायला चालु होतात 😅
सचिनचा वर्ल्डकपमधील आणखी एक रेकॉर्ड म्हणजे 20 सामन्यांमध्ये त्याने 1000 धावा पुर्ण केल्यात तर आज रोहितने 19 सामन्यांमध्ये 1000 धावा पुर्ण केल्या..
सचिनचे असे आणखी किती रेकाॅर्ड्स असतील हे कोणीच सांगु शकणार नाही 😅
बर सचिनची दुरदृष्टी पाहा!
29 मार्च 2012 म्हणजे तब्बल 11 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जेव्हा सलमान खानने सचिनला विचारले," काय वाटत तुझा रेकाॅर्ड कोण मोडेल? का कोणीच मोडु शकणार नाही??"तेव्हा पुढच्या ओळीत बसलेला सचिन हसत हसत उठला आणि म्हणाला,"मला वाटतय माझा रेकाॅर्ड मोडणारे याच खोलीत उपस्थित आहेत. मला वाटतय विराट आणि रोहित हे दोघे माझा रेकाॅर्ड मोडु शकतात.."
अश्याच नवनवीन गोष्टी जाणुन घेण्यासाठी मला ट्विटरवर(X) फोलोव करायला विसरू नका
Twitter (X) id :- @Mrutyyunjay (वसुसेन)
#WorldCup2023 #RohitSharma𓃵 #viratkohli #Bumrah #INDvAFG #SachinTendulkar #Salmankhan
टिप्पण्या