नित्यानंद बाबाचा देश आणि अमेरिकेला चुना
आपल्या देशातले बरीच लोकं भोंदू बाबांच्या तावडीत सापडलेली आहेत यात काही शंकाच नाही. या भोंदु बाबांच्या शर्यतीत बरीच नावं असली तरी 'नित्यानंद बाबा' नावाचा बाबा अलग लेव्हलचा खेळाडु आहे. बाकीचे खाली डबक्यात हातपाय मारतात पण मध्यंतरी या बाबाने डायरेक्ट आंतरराष्ट्रीय पातळीवर चुना लावला आणि तो पण अमेरिकेसारख्या देशाला!!
खालील ब्लॉगमध्ये आपण
१)नित्यानंद बाबाचा इतिहास
२)बाबाने चालु केलेला देश
३)मध्यंतरी गाजलेलं अमेरिकेच sister city प्रकरण
स्वामी नित्यानंदचा जन्म तमिळनाडू मध्ये झाला.तो स्वतःला 'स्वयंघोषित गुरू' मानतो, त्याच्या 'नित्यानंद ध्यानपीठम' नावाचे धार्मिक संस्था कार्यरत आहेत.वयाच्या १२ व्या वर्षी या बाबाला साक्षात्कार झाला अस याच म्हणणं असुन संपूर्ण भारतात त्याच्या ४७ संस्था चालु होत्या.
२०१० साली जेव्हा नित्यानंद बाबाचे एका तमिळ अभिनेत्रीसोबत Sexual act चे विडियो वायरल झाले तेव्हा याने सगळ्यांना स्पष्टिकरण देताना सांगितले की तो फक्त शवासन करत होता आणि तो नपुंसक आहे.जेव्हा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा तो 'नपुंसक' नसल्याचा रिपोर्ट CID ने कोर्टकडे जमा केला.
२०१८ साली नित्यानंदला बलात्कार, फसवणुक इ. आरोपांखाली पोलिस चौकशीला सामोरे जावे लागले. २०१९ साली तमिळनाडू मधील एक जोडपं गुजरातला जाऊन तेथील 'Gujarat state commission for protection of child rights' ला भेट देऊन सांगते की नित्यानंद बाबाच्या अहमदाबादमधील आश्रमात ४ मुलांना डांबुन ठेवलेल आहे.जेव्हा पोलिस त्या आश्रमात पाहणीसाठी गेली तर त्यांना फक्त २ च मुले सापडले तर उरलेले दोघ बेपत्ता होते.जेव्हा पोलिस नित्यानंद बाबाची शोधाशोध करायला जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येत की हा भाऊ तर २०१९ लाच देश सोडुन पळुन गेलाय
आता खरी कथा चालु होते
हा बाबा गेलाय कुठ तर या बाबाने अमेरिकेत इक्वाडोरजवळ एक बेट विकत घेऊन तेथे 'United states of Kailasa' नावाचा देश चालु केलाय. या देशाची स्वताची रिझर्व्ह बँक असुन ते लोकं स्वताचे चलन(ज्याला तो कैलाशियन डाॅलर म्हणतो) वापरत आहेत. याने स्वताच्या देशाचा झेंडा,राज्यघटना एव्हढच काय तर स्वताची अर्थव्यवस्थाच उभारली आहे, याची हवा म्हणजे ज्या लोकांना याच्या कैलासा देशाला भेट द्यायची आहे त्या लोकांनी आधी ऑस्ट्रेलिया विसा काढावा आणि तिथे जावे. तिथुन कैलासा देशाच स्वताच प्रायव्हेट जेटने लोकांना कैलासाला नेण्यात येईल.
कोव्हिड काळात नित्यानंद म्हणला होता की 'भारतानी मला आदरातिथ्यसहित स्विकारावं तरच मी भारतात येईल आणि मी आलो तर देशातला सगळा कोव्हिड गायब होऊन जाईल '
ही झाली या बाबाची एकंदरीत गोष्ट.
आता आपण यानं अमेरिकेसोबत नेमकं काय केलय ते पाहुया.
त्याआधी आपण 'Sister City' म्हणजे थोडक्यात जाणुन घेऊ. सिस्टर सिटी म्हणजे एकाच देशातले किंवा विविध देशातले दोन शहरांची जोडी. ही जोडी बनवण्यामागे मुख्य उद्देश असा असतो की त्या दोन शहरांत आर्थिक, तांत्रिक तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण वाढावी. Sister city बनवताना proper agreement केले जाते.
तर या आपल्या पठ्ठ्याने United States of Kailasa व अमेरिकेतील ३० शहरांमध्ये 'Sister City' Cultural agreement केल. हे शहरं अशी तशी नाहीत यात Ohio, Florida, Dayton, Virginia इ. नामांकित शहरांचा समावेश आहे. जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा 'Fox News' ने विविध शहरांत जाऊन विचारणा केली की "खरच तुम्ही या बाबाच्या देशासोबत sister city cultural agreement केल आहे का??" तेव्हा बर्याच जणांनी होय उत्तर दिलं. Fox news वाल्यांनी या सर्वांना एव्हढंच सांगितल की 'तुम्ही गुगल जरी केल असत की कैलासा नावाचा देश आहे तरी का?? तरी तुमच्या लक्षात आल असत' असो
अमेरिकेतील लोकांनी पण यावर आपल मत व्यक्त करताना सांगितले की,"आम्ही तुम्हाला एव्हढा कर देतो आणि तुम्ही कोणतीही शहानिशा न करता एका बलात्कारी बाबाच्या नादाला लागुन त्याच्या देशासोबत(जो की अस्तित्वातच नाहीय') करार करताय?"
जशी ही गोष्ट उघडकीस आली तशी 'City of Newark' ने Kailasa सोबतचा Sister city agreement मोडलं आहे.अरे या बाबाने तर UN(United Nations) ला पण सोडलं नसुन मध्यंतरी झालेल्या UN मिटिंगला 'United States Of Kailasa' या त्याच्या देशाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती.
तर अस हे एकंदरीत प्रकरण आहे.
ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा, आणखी मनोरंजक माहिती जाणुन घेण्यासाठी मला ट्विटरवर फॉलो करायला विसरु नका mrutyyunjay
वसुसेन
टिप्पण्या
इतके हुशार व जागरूक नागरिक असताना अमेरिका कशी भुलली असेल. खरचं
दुनिया झुकती है.... l
इतके हुशार व जागरूक नागरिक असताना अमेरिका कशी भुलली असेल. खरचं
दुनिया झुकती है.... l