शेअर मार्केट expiry बद्दल थोडसं..

शेअर मार्केटमध्ये सक्रीय असणार्यांना माहिती आहे की बरेच दिवस झाले आठवड्यातील ५ दिवस विविध expires असतात.
1)सोमवारी 'Nifty Midcap'.
2)मंगळवारी 'Nifty Financial Services' यालाच मार्केट करणारी 'Finnifty' म्हणुन ओळखतात.
3)बुधवारी लाडकी 'Bank nifty' 
4)गुरूवारी 'Nifty'
आणि 
5)शुक्रवारी 'Sensex' ची expiry असते
यामध्ये निफ्टी मिडकॅप ची lot size 75 , Finnifty ची lot size 40, bank nifty ची lot size 15, Nifty ची lot size 50 आणि sensex ची‌ lot size ही 10 आहे.
बर्याच जणांच्या बर्याच कुठलं almost सगळ्यांच्याच नजरेत expiry म्हणजे 'Hero Zero' माल छापायचा दिवस!!
Hero zero म्हणजे expiry दिवशी तुमच्या अगदी 150/200 रूपयांचे 2000/4000 रू. होतात पण एक गोष्ट लक्षात घ्या की याची शक्यता बरीच कमी असते. त्यामुळे तुम्ही Hero zero करत असताना एकतर घेतलेला contract Zero होऊन द्यायची तयारी ठेवावी जेणेकरून तस झालच तर तुम्हाला वाईट वाटणार नाही आणि तुम्ही सगळी रक्कम Hero Zero मध्ये न टाकता अशी रक्कम वापरा जी संपली तरी तुम्हाला ज्यादा फरक पडणार नाहीय. बर्याच जणांना सवय असते की अमुक तमुक ठिकाणावरून (टेलेग्राम, WhatsApp इ.) Paid अथवा फुकट ग्रुपवर hero zero call दिले जातात ते घ्यायचे..ते घेताना आपल्याजवळच सगळ कॅपीटल लावुन रिकामं व्हायच आणि zero झाल की डोक्याला हात लावुन बसायच..
आणि आता आठवड्यातुन ५ दिवस expiry म्हणल्यावर ट्रेडर लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं असणार यात दुमत नाही पण मागच्या बर्याच expires तुम्ही पाहिल्या तर त्या fail गेल्या आहेत. Fail म्हणजे मार्केट Sideways खेळत राहिलयं आणि त्यामुळे कोणत्याही एका बाजुला (Ce किंवा Pe) न गेल्यामुळे धड call पण वाढला नाही आणि Put ही..आणि डोक्यात ५ expires च गणित असल्यामुळे भरपुर Retailers थोडं थोडं करून आपल्याजवळचा पैसा गमवत आहेत..
एकच सांगु इच्छितो,
५ expiry बघु नका सांभाळून मार्केट करा!
५ expiry म्हणजे market ला आणखी ५ मार्ग झालेत तुमच्याकडून पैसे उकळायला 😅🤕

अश्याच नवीन गोष्टी जाणुन घेण्यासाठी मला ट्विटरवर @mrutyyunjay(वसुसेन) फोलोव करा.

#stockmarkets #sharemarket 
#option #index

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नित्यानंद बाबाचा देश आणि अमेरिकेला चुना

भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा

चीनला कामाला लावणारा Ghost particle(Neutrino)