चीनला कामाला लावणारा Ghost particle(Neutrino)

जगभरातल्या बर्याच शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी 'Big bang' थेअरीने या विश्वाची उत्पत्ती झाली त्यावेळी ghost particles अर्थात neutrino ने खुप महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. Ghost particle नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी आणि त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी बरेच देश सरसावले आहेत, अश्यावेळी चीन मागे राहिल अस वाटत का??
'ड्रॅगन'ला इंटरेस्ट तयार झाला आणि हे रहस्य उलगडण्यासाठी चीनने पुढाकार घेऊन जगातला सगळ्यात मोठा टेलेस्कोप बनवण्याचे ठरवले आहे..आणि तेही पाण्याखाली!!
खालील ब्लाॅगमध्ये,
१) टेलेस्कोपबद्दल माहिती करून घेऊया,
२)Ghost particles, Atom, neutron, electron बद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. आणि हो टेलेस्कोप पाण्याखालीच का बांधल्या जातोय ते पण पाहुया..
**सुरुवातीला टेलेस्कोपबद्दल माहिती घेऊया👇
चीनने पश्चिम पॅसिफिक महासागरात हा अवाढव्य टेलेस्कोप बसवायचं ठरवलं असुन याच फक्त एकच काम आहे..ते म्हणजे ghost particle चा शोध घेणे 😅.
चीनने त्याला TRIDENT(Tropical Deep-sea Neutrino Telescope) नाव दिलय अस ऐकण्यात आलेल आहे. किंवा याचे दुसरे एक नाव सुद्धा ठेवलय ते म्हणजे 'Ocean bell'.
पॅसिफिक महासागरात जवळपास ३.५ किमी खोलीवर😱 (११,५०० फुटांवर) हा महाकाय टेलेस्कोप बसवला जाणार असुन साधारण २०३० पर्यंत काम पुर्ण होण्याचे संकेत आहेत. सध्या जगातला सगळ्यात मोठा न्युट्रीनो-डिटेक्टिंग टेलेस्कोप अमेरिकेतील 'the university of madison-wisconson' ने बनवला असुन तो अंटार्क्टिका मध्ये स्थित आहे. त्याला 'IceCube' या नावाने ओळखले जाते. तुम्हाला चीनच्या Trident चा आकार समजण्यासाठी सांगायचच झाल तर Icecube चा आकार(जगातला सगळ्यात मोठा टेलेस्कोप) १ क्युबीक किमी आहे तर Trident चा आकार हा ७.५ क्युबीक किमी असेल अस चीनने घोषित केलय. आता तुम्हाला अंदाज आला असेल की चीन किती अवाढव्य प्रकल्प उभारत आहे ते!! चीन म्हणतय आम्ही एव्हढ्या मोठ्या प्रकल्पाच काम आधीच चालु केल आहे आणि हा टेलेस्कोप Icecube पेक्षा १० हजार पटींनी जास्त संवेदनशील असेल यामुळे आम्हाला जास्तीत जास्त Neutrino शोधायला मदत होईल एव्हढ मात्र नक्की..
आता आपण ghost particle थोडसं जाणुन घेण्याचा प्रयत्न करुया. 👇
पण ghost particle बद्दल जाणुन घेण्यासाठी आपल्याला फिजिक्समधील बेसिक असणार्या Atom बद्दल माहिती करून घ्यावी लागेल..(बहुतांश जणांनी माझ्यासारखं शाळा, काॅलेजमधी लक्ष दिलेलं नसाव 😜)
तर Atom म्हणजे थोडक्यात ज्यापासून ही सृष्टी बनलीय. आपल्या डोळ्यांना दिसणार्या आणि न दिसणार्या सगळ्यांमध्ये atom दडलेला असतो. शास्त्रज्ञांना कित्येक वर्ष वाटायच की Atom च सगळ्यात छोटा भाग आहे. ब्रम्हांडात यापेक्षा छोट काहीच नाहीय पण जसजस विज्ञानाने आपले पंख विस्तारले आणि नवनवीन शोध लागले तेव्हा 'sub atomic' particles चा शोध लागला. म्हणजे ज्यांच्यपासुन atom बनला असे कण!
Atom मध्ये proton(धन प्रभारक, positively charged), Electron(ऋण प्रभारक, negatively charged) आणि neutron(no charge) असतो.
तर आपल्या ब्लाॅगचा नायक अर्थात neutrino(ghost particle) हा एक प्रकारचा electron च(ऋण प्रभारक) आहे पण त्यांचा गुणधर्म हा neutron सारखा(कोणताही चार्ज नसलेला) आहे.. समजल का?
तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल पण आपल्या शरीरामधुन आत्ता या घडीला दर सेकंदाला trillions of Neutrinos ये जा करत आहेत. कारण ते सामान्य डोळ्यांना दिसण्यापलिकडचे असल्याने आपल्याला ते दिसतही नाहीत आणि जाणवतही नाहीत 😅. जगात आजपर्यंत बर्याच शास्त्रज्ञांना वाटायच की ghost particle ला कोणतही वस्तुमान(mass) नाहीय. These particles are massless! पण अलिकडच्या काळात शास्त्रज्ञांना neutrino ला वस्तुमान असत याचे पुरावे सापडले आहेत.
आता या गड्याला(neutrino/ghost particle) ना कोणता प्रभार charge(धन, ऋण) नाहीय ना याला वस्तुमान(mass) आहे मग याला शोधायचा तरी कसा?
इतक निरस आणि अनभिज्ञ असल्यानेच neutrino ला ghost particle नाव देण्यात आलं. 
पण एव्हढ्यावर थांबतील ते शास्त्रज्ञ कसले.. याला कोणतरी असेलच ना जो उत्तेजीत करत असेल किंवा ज्याच्या संपर्कात आल्यावर गडी खुष होत असेल..याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आणि मग जाऊन शास्त्रज्ञांना समजल की ,
"अरे!!!! हा गडी पाण्याला पाहिलं की तरतरी दाखवतोय..म्हणजेच काय तर पाण्यासोबत ghost particle प्रक्रिया करतो" आणि म्हणुन चीनने पाण्याखाली Trident ला बांधायच काम हाती घेतलं जेणेकरून ७.५ क्युबीक किमी एव्हढ्या अवाढव्य trident वर जास्तीत जास्त neutrino च्या हालचाली पकडल्या जातील. ज्यावेळी ghost particle ची पाण्यासोबत प्रक्रिया होते तेव्हा ते एक पदार्थ तयार करतात त्याला 'Muons' म्हणले जाते. हे Muons साधारण डोळ्यांना न दिसणारा पण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टिपल्या जाईल अश्या प्रकारचा प्रकाश तयार करतात!
शास्त्रज्ञांच्या मते हा प्रकाशच(muons) आपल्याला विश्वाच्या अनभिज्ञ गोष्टींवर प्रकाश टाकायला मदत करेल..जसेकी विश्वाचा उगम कसा झाला, ghost particle च काय योगदान राहिलय, cosmic rays बद्दल माहिती इ...🙌

अतिरिक्त माहिती:-
भारतात तमिळनाडूमध्ये 'Indian Neutrino Observatory' (INO) बनवण्याचे काम चालु आहे.

ब्लॉग आवडला असेल तर प्रतिक्रिया नोंदवा, शेअर करा आणि मला ट्विटरवर फोलोव करायला विसरू नका 
mrutyyunjay वसुसेन 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदिरा गांधींना ब्रेक लावणारा 'केशवानंद भारती' खटला

OBC आरक्षण देणारा आयोग:- 'मंडल आयोग' (भाग १)

भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा