भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा

संपल..
मागच्या दिड एक महिन्यापासून संपूर्ण देशात जो क्रिकेट सण साजरा होत होता त्याला आज पुर्णविराम लागला..भारतीय संघ खरच भारी खेळला, एकदम संतुलित वाटणारा हा संघ हार्दिक पांड्या जरी बाहेर गेला तरी आपलं संतुलन न जाऊन देता खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उरलेल्या १० खेळाडुंनी आपला बेस्ट परफाॅर्मन्स दाखवला..देशातील १५० करोड लोकांना प्रत्येक सामन्यानंतर आनंदच आनंद दिला!
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत जादुई प्रवास करणारा भारत यंदाचा वर्ल्डकप मारणार अशी जणु गॅरंटीच होती. त्यात 'आपणच जिंकणार' हा विश्वास वाढवायला जुन्या थेअर्या चघळल्या जात होत्या ज्यात,

१)२०११,२०१५,२०१९ ला वर्ल्डकप host करणारे देश जिंकले म्हणुन यावेळीही आपण जिंकणार.

२)२०११,२०१५,२०१९ ला ज्या देशांनी रन चेज केले ते संघ जिंकले(भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विवादित) दुर्दैवाने भारताला यावेळी टाॅस जिंकता आला नाही आणि पहिली फलंदाजी करावी लागली.

३)२०११,२०१५ व २०१९ ला अंतिम सामन्यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांपैकी जो कर्णधार ट्राॅफीच्या उजव्या बाजुला उभारलाय तो संघ वर्ल्डकप जिंकलाय.यावेळी रोहित शर्मापण उजव्या बाजुला उभारून सुद्धा दुर्दैवाने आपल्याला हार पत्करावी लागली इ...इ...

पण हा वर्ल्डकप आपल्या नशिबात नव्हताच म्हणा..रोहित आणि विराटच्या नशीबात वर्ल्डकप जिंकलेला कर्णधार-खेळाडु म्हणुन निवृत्त होण्याच भाग्य नव्हतच.
आज आपण हारण्यामागे टाॅस हारणे हा एक मोठा फॅक्टर ठरला अस बर्याच जणांना वाटत.त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाचे उच्चकोटीचे क्षेत्ररक्षण जिथे त्यांनी जवळपास ३५-४० धावा वाचवल्या, त्याची किंमत शेवटी शेवटी कळली आपल्याला..त्याबरोबर गोलंदाजांनी अत्यंत जबरदस्त दर्जाची गोलंदाजी केली, आपल्या फलंदाजांनी जिकडे चेंडु मारला तिकडे क्षेत्ररक्षक लावलेलाच असायचा, अस वाटायच की ऑस्ट्रेलियाचे १८-२० खेळाडु मैदानावर खेळत आहेत.आपल्या खेळाडुंनी पण हकनाक प्रेशर घेतलं अस मला वाटत कारण मधल्या ११-४० षटकांत आपल्या खेळाडुंनी १-२ धावा पळुन जरी काढल्या असत्या(जिथे जमु शकलं असत) तरी आपली धावसंख्या ६०-७० ने वाढली असती!!
जस रोहित तो खराब शाॅट मारून आऊट गेला तस भारताच्या धावांना कच्चकरून ब्रेकच लागला..आपल्याला चौकार-षटकार सोडा १-२ धावा काढायला पण स्ट्रगल कराव लागत होत. अक्षरशः पडु पडुन आपण एक एक धाव गोळा करत होतो. गीलचं तर राव आवडीचं मैदान असुन त्यानेही हातात कॅच मारला आणि विकेट टाकली..जेव्हा गीलने कॅच मारला तेव्हा ॲडम झांपा जाग्यावरून एक इंचपण हालला नव्हता .. डायरेक्ट त्याच्या हातात बाॅल विसावला..विराट आला आणि रोहित-विराट या vintage जोडीकडुन ऑस्ट्रेलियाविरूद्धचा २०१३ सालचा खेळ दिसेल अशी अपेक्षा करत असताना रोहित मॅक्सवेलच्या चेंडुवर चुकीचा फटका मारून आऊट गेला. खर पाहिलं तर ट्रॅव्हिस हेडने रोहितचा जो कॅच पकडला त्याला खरच तोड नाही..रोहित-गील गेल्यावर श्रेयस अय्यर आला. आपल्या top form मधी असणारा अय्यर ४ धावांवर किपरकडे कॅच मारून आऊट गेला आणि नेमकं भारताला तिथे मोठा डेंट पडला! के एल आणि विराट चांगल खेळणार म्हणलं की विराट ५४ धावांवर स्लो डिलिव्हरीला गंडला आणि त्याचा पण स्टंप उडाला! के एलच्या जोडीला सर जडेजा उतरले..खरतर आज जडेजा कडुन खुप अपेक्षा होत्या..सर कडुन ३५-४० वेगवान धावांचे अमुल्य योगदान येईल अस वाटत असताना भाऊंची विकेट पडली..मग परत के एल खेळला पण ह्या संपूर्ण खेळात जिथे १-२ धावा निघत होत्या तेव्हढ्या पण घेतल्या नाहीत राव आपल्या फलंदाजांनी..ते एक ले खटकलं मनाला! 
बाकी भारतीय शेपटीने मौल्यवान धावा जोडल्या नाहीतर गुडघ्यावर रांगत रांगत २०० धावांपर्यंत पोहचणंदेखील मुश्किल होत आपल्याला..
जसा रोहित आऊट गेला तसा भारतीय बॅटिंगमधला आत्माच गेला अस वाटायला लागल़ मला, एका विकेटने सगळा momentum आपल्याकडुन ऑस्ट्रेलियाकडे shift झाला..पण हा खेळच असाय जर तुमचा दिवस नसलाच तर कितीपण घासा काहीच उपयोग नाही..जे व्हायच ते होणारच!
आपली खरी मदार गोलंदाजांवर होती पण आज त्यांचाही दिवस नव्हता म्हणायचा..
झाल सगळं आता, आज जर जिंकलो असतो तर डोळ्यातुन आसवं आली असतीच पण ते 'आनंदाश्रु' म्हणुन..पण आता येतायत ते 'दुखाचे अश्रु' येतायत!
आणि काय तो मोदी स्टेडियमवरचा क्राऊड!
आपल्याला जरा मार पडली की जीव नसल्यासारखे उभारायचे..अर जवळपास एक लाख तीस हजार प्रेक्षक पण सगळे dead body मध्ये रूपांतरित झाल्यासारखे गप गार!!
तोच जर सामना वानखेडेवर असता तर....?? इथली पब्लिक बाकीच्यांपेक्षा जरा जास्तच प्रगल्भ आहे अस मला वाटत..असो!
यामागच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल न बोललेलच बरय आपल्याला.. नाहीतर हारलोय म्हणुन कारणं दिल्यासारखं वाटतील(जरी आपला मुद्दा बरोबर असला तरी)
ऑस्ट्रेलियन संघाला 'ऑस्ट्रेलिया' का म्हणल़ जातं हे त्यांनी जगाला पुन्हा एकदा दाखवुन दिले आज..त्यांच्याकडे असणारा अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'Daring' खरच कौतुकास्पद आहे. लाखाच्यावर असणारा क्राऊड आणि त्यांच ओरडणं, ग्राऊंडवर विराटचा खुन्नस देत चालणारा वावर,शामी-बुमराहचे नागमोडी चेंडु.सगळ काही दबावतंत्रच!
पण ज्यावेळी त्यांनी सामना जवळपास खिश्यात घातला तेव्हा त्या ११ जणांचा आवाज आपल्या १५० करोड लोकांच्या ओरडण्यापेक्षा जास्त ठळक,खणखणीत आणि आत्मविश्वासाने भरपुर होता..
Well played Australia 🦘 you deserve this cup!
And better luck next time champ Indian team. You guys were really good today but unfortunately today was not your day 😭
रोहित...यार...खरच तुला रडताना पाहुन मन भरून आलं..
तु जेव्हढं संघाला देता येईल तेव्हढं दिलस..वातावरण हसत खेळत ठेवलसं, खालच्या फलंदाजांवर दबाव येऊ नये म्हणुन स्फोटक फलंदाजी करून कमीत कमी चेंडुत जास्तीत जास्त धावा बनवण्याचे तुझे कौशल्य प्रेमात पाडणारे होते..या वर्ल्डकपमधील वयाच्या ३६ व्या वर्षी तु घेतलेला 'नवीन अवतार' पाहुन माझ्यासहित जगभरातील असंख्य क्रिकेटप्रेमी छाती बाहेर काढुन फिरायचे.‌.तुझ्या खेळीच्या धुंधीत राहायचो आम्ही! काय सांगु भाऊ ज्यावेळी तुझ्या बॅटमधुन षटकार आणि चौकार निघायचा तेव्हा उकळ्या फुटायच्या आम्हाला इकडे...पण तेव्हढीच धडधड वाढायची!
कारण तु काय क्षमतेचा फलंदाज आहेस हे सगळ्या जगाला माहितीय..रिस्क घेऊन खेळल्याशिवाय तु कधीच खेळला नाहीस, ना या वर्ल्डकपला..ना याआधी कधी!! पण हीच रिस्क तुला अनेक माईलस्टोन गाठण्यापासुन वंचित ठेवणार याची भिती राहायची आम्हाला..या वर्ल्डकपला तसच झाल.
Nervous ४० मध्ये तु ४-५ वेळा आऊट गेलास..पण ठीक आहे भावा..तु कर्णधार म्हणुन 'वर्ल्डकप' जरी नाही जिंकलास तरी माझ्यासारख्या चाहत्यांच 'मन' पुन्हा एकदा जिंकलस!!
मला माहितीय की क्रिकेट,रोहित आणि वर्ल्डकप म्हणले की कितीही लिहिता येऊ शकते..पण मी थांबतो आता..
मागच्या दीड महिना तुम्ही सगळ्यांनी आम्हा क्रिकेट रसिकांना ज्या गोड आठवणी दिल्या त्याबद्दल खुप खुप आभारी आहे!!
जिंकणे हारणे चालत राहते..लढणे आणि प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे ..





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नित्यानंद बाबाचा देश आणि अमेरिकेला चुना

चीनला कामाला लावणारा Ghost particle(Neutrino)