विराट कोहली स्वार्थी का निस्वार्थी?
आज विराटने ज्याप्रकारे त्याच 48 एकदिवसीय शतक पुर्ण केल ते पाहुन माझ्यासकट सगळेच बुचकाळ्यात पडलेत..
आणि मॅच संपल्यापासुन सगळीकडेच विराट कोहली स्वार्थी खेळला, विराट कोहली अगदी बरोबर खेळलाय, जी मॅच लवकर संपवता आली असती ती स्वतासाठी लांबवली आणि संघाच्या NRR ला कमी केलं किंवा रोहितमुळे विराटला एकदिवसीय सामन्यात कमी संधी मिळालीय(जुना विषय) या चर्चांना उधाण आल आहे. Anti Kohli आणि Pro Kohli अश्या दोन गटांमध्ये तुंबळ शाब्दिक हाणामारी चालु आहे.कोहलीला विरोध करणारे दुसर्या खेळाडुंचे समर्थक आहेत(खासकरून रोहित शर्माचे).
याबाबत आपण थोडासा व्यवस्थित आढावा
घ्यायचा प्रयत्न करूया..
तर विषय असा झाला की आज भारत विरुद्ध बांगलादेश मधील विश्वचषकीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या 256 धावा झाल्या. भारताने चेज करताना रोहित हिटमॅन शर्मा आणि शुभमन गीलने संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. आवडीचा पुल शाॅट मारण्याच्या नादात रोहित आऊट झाला आणि त्याचे अर्धशतक दुर्दैवाने २ धावांनी हुकलं तर गीलचं अर्धशतक पुर्ण झाल..रोहित गेल्यावर मैदानावर किंग कोहलीचे आगमन झाले.
आल्या आल्या कोहलीला मस्तपैकी दोन नो बाॅल म्हणजेच दोन फ्री हीट मिळाल्या आणि भाऊने एक सिक्स,एक बाऊंड्री मारून धडाक्यात सुरूवात केली.
के एलच्या जोडीने चेज मास्टर कोहली नेहमीप्रमाणे धावा करत होता..सिंगल डबल ला प्राधान्य देत, मध्येच एखादा ट्रेडमार्क कोहली शाॅट लगावत तो 256 धावांच्या टार्गेटजवळ चालला होता..साथीला के एल चा क्लास होताच!
इतक्यात सगळ्यांच्या लक्षात आल की कोहली शतकाजवळ पोहचलाय.त्याला शतक पुर्ण करण्यासाठी आणि भारताला जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 2011 सालापासून कोहली वर्ल्डकपमध्ये खेळतोय म्हणजेच हा त्याचा चौथा वर्ल्डकप..पण आजतागायत धावांचा पाठलाग करताना त्याच्या बॅटमधुन कधीच शतक आले नव्हते!
47 एकदिवसीय शतकांचा मालक, चेज मास्टर म्हणुन संपुर्ण जग ज्याला ओळखत..चेज करताना तब्बल 26 एकदिवसीय शतकं मारलेला 'किंग' वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्टेजवर चेजमध्ये एकही शतक नसल्याने 'भिकारी'च होता..😪
मग विषय असा चाललेला की 15 धावांची गरज असताना विराटने जगाला त्याचे आजपर्यंत न पाहिलेले रूप दाखवले..शतक पुर्ण करण्यासाठी चक्क तो स्वार्थी खेळला..
शेवटच्या 3 ओव्हर्सला विराटच स्ट्राईकवर राहिला. भले एक धाव घेता येऊ शकत होती तरी त्याने आणि के एल राहुलले एक धावही घेतली नाही..इथ आता तुम्ही समजुन घ्या..
१) भारताला फक्त 15 धावा हव्या होत्या आणि जवळपास 10-11 षटकं शिल्लक होती.
२)केएल च्या म्हणण्यानुसार विराटने के एल ला
सांगितले की तु पळ आपल्याला मॅच जिंकवायची आहे. मी जर माझ्या शतकासाठी खेळलो तर लोकांना वाटेल मी 'personal milestone' साठीच खेळतोय..पण के एलनेच विराटला शतक पुर्ण करण्यास पाठिंबा दिला आणि जिथे एक धाव निघत होती तिथे तो पळाला नाही..कारण विराटला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावा म्हणुन!!
३)बांगलादेशने अतिहुशारी करत वाईड बाॅल टाकुन भारताला जिंकवायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फेल गेला 😂
हे झाल आज मैदानावर जे घडलं त्याच स्पष्टीकरण..आता आपण विराटकडे जरा दुसर्या दृष्टीकोनातून पाहुया..
त्यासाठी खालील फोटो पाहा 👇
आज विराटला बरेच जण नाव ठेवत आहेत पण हा तोच विराट आहे ज्याने आपल्यासाठी वेळोवेळी देश मोठा आहे हेच दाखवल..हा तोच विराट आहे ज्याने नवीन उभरणार्या खेळाडुंना प्रोत्साहन देऊन त्याच्यातला खेळाडु बाहेर काढायचा प्रयत्न केलाय..
आणि मुळात मलातरी विराटची आजची खेळी स्वार्थी वाटत नाही कारण हा तोच विराट आहे ज्याला टीम मॅनेजमेंटने वेस्ट इंडिज विरूद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यात रोहितसोबत विश्रांती दिली,
याच विराटला आशिया कपमध्ये बांगलादेश विरोधात विश्रांती दिली होती..ज्या विराटला सचिनच्या 49 एकदिवसीय शतकांचा रेकाॅर्ड मोडायला फक्त दोन शतकांची गरज आहे त्याला BCCI आणि मॅनेजमेंटने बसवणे कितपत योग्य होते? 2022 साली विराट कोहलीला न्यूझीलंड, साऊथ आफ्रीका, झिंबाब्वे आणि वेस्ट इंडिज विरूद्ध एकदिवसीय सामन्यात total rest दिली होती..अस का???
बर काही विराटचे अंधभक्त म्हणतील की रोहित शर्मा कॅप्टन झाल्यापासून विराटसोबत गेम चाललाय किंवा सचिनचा रेकाॅर्ड मोडण्यापासुन वाचवण्यासाठी 'मुंबई लाॅबी' विराटला विश्रांती देत आहे त्यांना सांगु इच्छितो की विराट सोबत रोहितला पण या सगळ्या सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती..एवह्ढच काय तर रोहित कर्णधार झाल्यापासुन विराट त्याच्यापेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळलाय..
त्यामुळे आधीच तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ट्रोल करणं बंद करा कारण तेव्हढी आपली लायकी नाहीय..दोघपण निस्वार्थीपणे आपल्या देशाची सेवा करतात आणि दोघेही लेजंड आहेत!
बाकी जेव्हढी विश्रांती विराटला दिली गेली त्याबद्दल मलाही राग आहेच..नाहीतर आत्ता विराटचे 50+ शतकं निवांत असते..
साधं गणित सांगायचच तर 2019 च्या वर्ल्डकपनंतर रोहितने एकुण 30 तर विराटने एकुण 21 एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत..
त्यामुळे आज विराटने जे केल ते एकप्रकारे योग्यच केल अस मला वाटत कारण शेवटी कोणाला आपले personal mile stone नको असतात राव??
तो बिचारा एव्हढ्या कष्टाने त्याठिकाणी पोचलाय त्याला खेळुद्या..आपण असही जिंकणार होतोच ना? आणि हो..जे पंडीत लोकं विराटला स्वार्थी म्हणतायत त्या पंडीतांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटच well deserving शतक हुकल्यावर जरा पण वाईट वाटल नसलं..
अरे त्या खेळाडुने आपल्याला खुप आनंद दिलाय..अनेक बिकट प्रसंगातुन भारताला वाचवलय..कर्णधार असताना भले एक चषक जरी त्याला एक चषक जिंकता आला नसला तरी भारतीय संघाच्या विचारप्रणालीत आमुलाग्र बदल घडवुन आणलाय त्यान!!
मी हार्डकोर रोहित शर्मा फॅन आहे पण विराट आणि रोहित या दोन्हीही लेजंड्सला ट्रोल करण्याएव्हढी आपली लायकी नाहीय याचे भान ठेवा!
त्यांचा हा अखेरचा चषक आहे..आपण सगळ्यांनी मिळुन आनंद लुटुया. विराटने आज जे काही केलं त्यामुळे BCCI आणि टीम मॅनेजमेंटने त्याला विनाकारण विश्रांती देण्यामागची अस्पष्टता ठळक झालीय..माझ तर विराटच्या खेळीला पुर्ण समर्थन आहे!!
बाकी केएल च्या जागी हार्दिक पांड्या असता तर विराटच शतकं नक्कीच हुकल असत!!😂🤕
अश्याच नवनवीन गोष्टी जाणुन घेण्यासाठी मला ट्विटरवर फॉलो करा @mrutyyunjay वसुसेन
टिप्पण्या