डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मचं का स्विकारला?
घटनेचे शिल्पकार आणि उच्चविद्याविभूषित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन बर्याच चढ उतारांनी भरलेले होते..आज संपूर्ण जग बाबासाहेबांना 'महामानव' म्हणुन ओळखते..आपल्या शेवटच्या काळात त्यांनी धर्मपरिवर्तन करायचा निर्णय घेतला आणि तब्बल २० वर्ष सगळ्या प्रस्थापित धर्मांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यांनी त्यांच्या जवळपास ३ लाख ८० हजार अनुयायांसमवेत 'बौद्ध धर्म' स्विकारला..
पण बाबासाहेबांनी नेमका बौद्ध धर्मच का स्विकारला? बाकीच्या धर्मांबद्दल त्यांचे मत काय होते? याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया..बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्म स्विकारला परंतु हे करण्या पुर्वी त्यांनी जवळपास दोन दशकं सगळ्या धर्मांचा सखोल अभ्यास केला.बौद्ध धर्म निवडण्यामागे अनेक कथा असल्या तरी बाबासाहेबांनी 'बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य' ह्या निबंधात उत्तर दिले आहे.ह्या निबंधामध्ये त्यांनी जगातले ४ महत्त्वाचे धर्म आणि त्यांच्या प्रतिनिधींची तुलना केलीय.ते म्हणजे 'गौतम बुद्ध,येशु ख्रिस्त,मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण'.
बाबासाहेब म्हणतात,"बुद्धांना उरलेल्या ३ जणांपासुन कोणती गोष्ट वेगळी करत असेल तर ती आहे त्यांची स्वतःबद्दलची उदासिनता अथवा त्याग"...बाबासाहेब म्हणतात,"येशु म्हणायचे की मी साक्षात देवाचा मुलगा असुन ज्यांना स्वर्गात जायचयं त्यांनी मान्यच केल पाहिजे की मी देवाचा मुलगा आहे.पैगंबर एक पाऊल पुढे जाऊन म्हणायचे की मी अल्लाह चा दुत असुन मीच शेवटचा दुत आहे.श्रीकृष्ण ह्या दोघांच्या २ पाऊल पुढे जाऊन फक्त देवाचा मुलगा अथवा देवाचा दुत एव्हढ्यावर न थांबता मी स्वताच परमेश्वर असुन माझ्या अनुयायांनी मला 'देवाधिदेव' संबोधावे अस म्हणायचे."
पण गौतम बुद्धांनबद्दल लिहीताना बाबासाहेब म्हणतात,"त्यांनी स्वतःला कोणतीच पदवी बहाल केली नाही.ते एका सामान्य मनुष्याच्या पोटी जन्माला आले,आयुष्यभर सामान्य म्हणुन जगले आणि त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार,उपदेश एका सामान्य माणसासारखा केला.त्यांनी कधीच आपल्याकडे एखादी दैवी शक्ती आहे असं भासवलं नाही अथवा तिचं प्रदर्शनही केले नाही.बुद्धांनी 'मार्गदाता' आणि 'मोक्षदाता' ह्यामधला फरक स्पष्ट केला.पैगंबर,येशु हयांनी शिकवल्याप्रमाणे ते बोलतील तो शब्द देवाचा अशी शिकवण दिली.श्रीकृष्ण स्वतः देव असल्यामुळे तिथ प्रतिप्रश्न करता येत नव्हता परंतु बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना समजावलं, "मी जे शिकवतो ते १०० टक्के बरोबरच असेल अस नाही,त्यात त्रुटीही असतील पण तुम्हाला आयुष्य जगताना काही अनुभव आले तर त्या शिकवणीमध्ये सुधारणा करा आणि योग्य काय आहे ते लोकांना सांगा".
ज्यावेळी बाबासाहेब दीक्षाभूमीवर उभारले तेव्हा त्यांनी जमलेल्या बांधवांना आवाहन केले की,
"मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेलो नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन.
बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन, ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं.."
मला वैयक्तिकपणे वाटत की धर्माच्या प्रवासामध्ये मुळ विचारांना अनेक शाखा,उपशाखा फुटत गेल्या व त्यामुळे प्रत्येक धर्मात त्रुटी,गोंधळ निर्माण होत गेला पण धर्म वेगळे असले तरी सगळ्यांचा गाभा(शिकवण) एकच..फक्त त्या गाभ्यापर्यंत जाण्याचे मार्ग(धर्म) वेगवेगळे!!..
तुम्हाला काय वाटत? नक्कीच मत मतांतर होण्यासारखा हा ब्लॉग आहे. जाणुन घेण्यास नक्की आवडेल 👍
अश्याच विविध विषयांवर माहिती मिळवण्यासाठी मला ट्विटरवर फोलोव करा @mrutyyunjay वसुसेन
टिप्पण्या