मराठा आंदोलन किस्सा BMW X1 चा
खुप वेळ झाला हा फोटो सामाजिक माध्यमांवर फिरत आहे आणि बरेच जण म्हणतायत तुम्ही(मराठा जातीतले) जर इतक्या महागड्या गाड्या वापरत असाल तर मराठ्यांना कशाला पाहिजे आरक्षण? करोडोची गाडी वापरता आणि आरक्षण मागता...
भावना बाजुला ठेवल्या आणि जर वेगळ्या दृष्टीने पाहिले तर असं लक्षात येईल की मुळात ही
गाडी BMW कंपनीच्या X series मधली आहे. X1 माॅडेल असणारी ही गाडी Third owner म्हणजेच या गाडीचा हा तिसरा मालक आहे..
Second hand घ्यायला गेलं तर हीच गाडी 8-9 लाखांना मिळुन जाईल ही तर third owner आहे..म्हणजे साधारण 5-6 लाखांपर्यंत मालकाने ही विकत घेतली असेल!
हा झाला पहिला मुद्दा
आता दुसरा मुद्दा पाहुया..
या गाडीच्या मालकाचे आडनाव 'भिडे' अस दाखवत आहे. इथ उपस्थितांपैकी कोणीतरी मला सांगावे की मराठा समाजात 'भिडे' आडनाव असत का?? मी स्वतः मराठा असलो तरी माझ्या ऐकण्यात-पाहण्यात भिडे आडनाव कधी आलेलं नाहीय ना ही त्या आडनावाची व्यक्ती 😅
असेल तर करेक्ट करा!
आणि तिसरा मुद्दा..
गाडी कोणतीही असेना प्रत्येक समाजात जसे गरिब असतात त्याच प्रकारे गबरगंड श्रीमंत देखील असतातच! एखाद्या जातबांधवाने स्वतःच्या मनगटाच्या जीवावर असो किंवा वडिलापोर्जित संपत्तीच्या जोरावर असो ही गाडी घेतली असेल..
मान्य आहे की आपण आरक्षण का मागतोय या मागचे कारणसमजुन घ्यायला पाहिजे, आज मराठा समाजामध्ये असे बरेच जण आहेत ज्यांना खरच आरक्षणाची गरज आहे..पण या गाडीवरून अख्ख्या समाजाबद्दल एकाच प्रकारचे मत मांडणे आणि तेही पुर्ण शहानिशा न करता..हे मला न पटणारे आहे!!
टिप:-आजपण मी महागड्या गाड्या, सोन्याची दागिने आणि भरजरी कापडं घालुन आंदोलनात मिरवणार्या मराठा बांधवांच्या विरोधात आहे आणि कायम या वैचारिक दळिद्रींच्या विरोधात राहीन याबद्दल दुमत नाहीच!!
पण या एका BMW X1 Third Owned गाडी जिचा मालक 'भिडे' आहे यावरून पोकळ मत मांडणार्यांनादेखील माझा विरोध राहील
💯🔥👍
अश्याच नवनवीन गोष्टी जाणुन घेण्यासाठी मला ट्विटरवर(X) फोलोव करायला विसरू नका
Twitter (X) id :- @Mrutyyunjay (वसुसेन)
#मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मराठा_आरक्षण
#OBCमधुनचमराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील
टिप्पण्या