मनोज जरांगे पाटील आणि राजकारण

जरांगे पाटलांच्या मागे बहुसंख्येने #मराठा समाज उभा आहे हे संपूर्ण देशाने काल पाहिले. ऑक्टोबर हीट, पोटापाण्याचा प्रश्न, लांबचा प्रवास या सगळ्या गोष्टी अक्षरशः फाट्यावर मारत शेकडो किलोमीटर वरून ट्रकाच्या ट्रका भरून मराठ्यांनी गर्दी केली होती..
आपल्या समाज बांधवांकडुन मिळालेलं हे अनपेक्षित प्रेम आणि प्रतिसाद पाहुन जरांगे पाटलांनीही 'मी सावलीत उभारून बोलणार नाही. माझ्या डोक्यावरचा मंडप काढुन टाका' अस वक्तव्य केलं आणि आपणही आपल्या समाजातलाच असंख्यातला एक घटक आहे याचे उदाहरण दिले..
काल त्यांनी स्टेजवरून जी वक्तव्यं केली त्या प्रत्येकाला काहीतरी पार्श्वभूमी आहे.. त्यांचे आणि त्यांच्यासारख्या तमाम समाज बांधवांचं त्यामागे निरिक्षण आहे..अनुभव आहे!
गुणा सदावर्ते उर्फ 'वेल्डर' नेमकं कोणाच पिल्लु आहे हे सगळ्या राज्याला चांगलच माहितीय..
जरांगेला उचला ती व्यक्ती हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करेल अश्या प्रकारची भाषा गुणाने वापरली खरी..
पण काल सभा आटोपुन माघारी जाताना प्रत्येक मराठ्याने पडलेला कचरा, बाटल्या उचलुन आणि नियमांचे पालन करत एकमेकांना सहकार्याची भावना दाखवत गुणाच्या मुस्काटात लावली..आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी मोडुन सोबतच्याला खायला दिली..अगदी तो कुठच्या गावचा आहे, त्याची परिस्थिती काय आहे याची कारणमिमांसा न करता!!
एक व्यक्ती अस वागली तर आपण तिच्याबद्दल चांगला दृष्टिकोन तयार करतो इथ तर काल लाखो लोकांनी मन जिंकल 🔥💪
ही अक्कल दोन चारशे रूपये देऊन आणलेल्या गर्दीला नसते..त्यांना फक्त उपस्थित राहण्याचे पैसे मिळालेले असतात आणि कधी एकदा कार्यक्रम आटोपून पळुन जातोय याचा ते विचार करत असतात..काल जमलेले सगळे समाजबांधव हे दररोजच्या जिवनात चटके सोसणारे, विचारांनी प्रगल्भ, गरिब असले तरी मनाने कुबेर, सोबत चालणार्या प्रत्येकाला मदतीचा हात देणार्यातले होते!
कुणाचं दुकान असेल, कोण खासगी नोकरी करणारा असेल कोणी मोठा व्यावसायिक असेल तर त्यातले बरेच जण ज्यांना आरक्षणामुळे सरकारी नोकरीत फायदा होईल असतील..काही जण डोळ्यांत स्वप्न बाळगुन बसले असतील, तर काही आपल्या समाजाची ताकद दाखवण्यासाठी एकत्र आलेले असतील..इतिहास ढुंढाळला तर मराठ्यांनी कायम इज्जतीत राहण्यास आणि विनाकारण कुणाच्या वाकड्यात न जाण्यास प्राधान्य दिलय हेच दिसतं..
मनोज जरांगे यांच्या रूपाने समाजाला आपल्या मागण्या मांडायला एक पारदर्शक आणि कणखर आवाज मिळालाय ही चांगलीच गोष्ट आहे! त्यांच्यामुळे सगळे एकत्र येत आहेत पण चांगल्या कामात खोडा घालायची जुनी प्रथाच असल्याने आता पुढच्या येणार्या काळात बरेच राजकीय - बिगर राजकीय पंडीतं, स्वयंघोषित तज्ञ, कायदे पंडीत आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील..आपली एकी तोडायचा आटोकाट प्रयत्न करतील!
विविध समाज माध्यमांचा वापर करून, बाॅट लावुन ,पैसे देऊन आयटी सेल कामाला लावतील..या सत्ताधार्यांची जुनी खोडच आहे की समोरचा ले जड झालाच तर विषयांतर करायचे आणि दुसरीकडे लक्ष वेधुन घ्यायच..पण आपण आपल्या मागण्या आणि आपले अल्टीमेट ध्येय डोळ्यांसमोर तेवत ठेवायचं व मनोज_जरांगे_पाटील यांच्या मागे ठाम उभा राहायच.. कारण कधीकधी 'आपल्या आंतरात्म्याचा आवाज ऐकुन विश्वास ठेवणे' हाच एकमेव मार्ग राहतो!!
कालपासून विविध समाज माध्यमांवर #मराठा समाजाला बदनाम करण्याचा डाव चाललेलाच आहे पण असल्या फुटकळ आणि भिकारचोट डावांना भीक घालणारा आपला समाज नाहीय..जस महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दिलीय अगदी तसच मराठ्यांनीही सगळ्यांना सोबत घेऊन(सर्व जात-धर्मातील बांधव) महाराष्ट्राच्या प्रगतीचा रथ धावता ठेवलाय..
खेद याचा वाटतो की ज्याच्यापासुन आपल्याला लांब पळायला सांगतात शेवटी त्याच्याच दरवाजासमोर जाऊन थांबाव लागत आणि ते म्हणजे
'राजकारण'..
राजकारण अशी दलदल आहे जिच्यात इच्छा नसतानाही आपण खेचल्या जातो आणि काही मुरलेले चिवट राजकारणी त्या दलदलीतही बटरफ्लाय स्ट्रोक(पोहण्याचा एक प्रकार) मारण्यात एक्स्पर्ट असतात😅..
मराठ्यांनी अश्या कित्येक कार्यकर्त्यांना शुन्यातून शंभर केलय..मोठमोठ्या पदावर बसवलय, आमदार-खासदार-मंत्री बनवलं आणि तेच झाकणझुले आज आपल्यालाच गोड बोलुन कोपर्याला गुळ लावुन मराठ्यांवर पाय वर करून मु*त आहेत 😡
राजकीय ताकद असल्याशिवाय बर्याच गोष्टी पुर्ण होऊ शकत नाहीत..बाहेर बसुन आजपर्यंत कुणाचच भल झाल नाहीय प्रत्येकाला या दलदलीत उडी मारावीच लागलीय हा इतिहास आहे..भले स्वतः मैदानात उतरा किंवा बाहेर बसुन शक्ती द्या! पण राजकारणाला टाळुन काहीच होऊ शकत नाही..
म्हणुन जर सगळ प्रामाणिकपणे घडलच तर मनोज जरांगेंनी राजकारणात प्रवेश करावा..स्वताचा पक्ष स्थापन करावा. लाईमलाईट आणि आमिषांना, चकाकीला भुलुन न जाता आपण आपलं जीवन ज्यांच्यासाठी वाहीलय त्या मराठा समाजातील बांधवांना डोळ्यासमोर ठेऊन जरांगे पाटील चांगल काम करतील..
संपूर्ण समाज त्यांच्या मागे एकगठ्ठ्यानं उभा राहील यात कोणतीही शंका नाही.
आजपर्यंत मराठ्यांनी किती तरी लायकी नसलेल्या नको त्या शेंबड्या, अपरिपक्व, अकार्यक्षम आणि हुल्लड लोकांना मोठं केलय..आणि त्याच लोकांनी आज समाजालाच उडुन लाथा घातल्यात!
त्यापेक्षा जरांगे पाटलांचे हात बळकट केले तर काय वाईट आहे??

आपणास काय वाटत?

असेच नवनवीन लिखाण वाचण्यासाठी @mrutyyunjay ला ट्विटरवर फोलोव करा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नित्यानंद बाबाचा देश आणि अमेरिकेला चुना

भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा

चीनला कामाला लावणारा Ghost particle(Neutrino)