इस्त्राईल पॅलेस्टाईन पुर्व इतिहास

गेले दोन दिवस झाले तुमच्या कानावर इस्त्राईल, पॅलेस्टाईन, गाझा पट्टी, अल अक्सा मशीद असे शब्द बघण्यात येत असतील..
खालील ब्लॉगमध्ये मी या गोंधळाचा केंद्रबिंदु असणारी 'अल अक्सा मशीद' आणि तिचा इतिहास सांगायचा प्रयत्न केलाय..
सुरूवातीला थोडासा सारांश:-
इस्त्राईलमध्ये 'वेस्ट बॅंक' नावाचा एक भाग आहे.या भागात पॅलेस्टेईन लोकं राहतात आणि या लोकांच खुप आधीपासून म्हणण आहे की इस्त्राईलने अनधिकृतरित्या सगळ्या भुभागाचा कब्जा केलाय. या मुद्द्यावरून त्यांच्यात आधीपासुन 'तुतु-मैंमैं' चालुय आणि हा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे.
बर.. इस्त्राईलच्या एका बाजुला 'मेडिटेरानियन sea' ज्याला मराठीत 'भुमध्य समुद्र'( चारी बाजुंनी जमीन असल्याने) म्हणुन ओळखले जाते त्या दोघांच्यामध्ये 'गाझा पट्टी' आहे.
या गाझा पट्टीमध्ये 'हमास' नावाची संघटना कार्यरत असुन ही संघटना राजकारणात देखील सक्रीय आहे. हमास आणि इस्त्रायलमध्येही सतत काहीना काही धुसफूस चालु असते. परवा हमासने इस्त्राईलवर जवळपास ५००० मिसाईल सोडुन दिल्या आणि त्यात अनेक लोकं मृत्यूमुखी पडले.
इस्त्रायलचा 'Iron Dome' पण कन्फ्युज झाला की नेमकं काय कराव..Iron dome अस तंत्रज्ञान आहे ज्यामुळे इस्त्रायलवर अनपेक्षित हवाई हल्ला झालाच तर हे तंत्रज्ञान समोरच्या मिसाईल्सवर नेम लावुन स्वताजवळील मिसाईल सोडतं आणि हवेतच दुश्मनाच्या मिसाईल फोडुन टाकतं.
बर आता मी तुम्हाला हळूहळू आपल्या मुख्य विषयाकडे घेऊन येतो.
तर हमासने इस्त्राईलवर अचानक ५००० मिसाईल डागण्यामागे कारण काय आहे तर ते आहे 'अल अक्सा मशीद'!
(लिंक लागली का?)
'हमास'चा प्रमुख मोहंमद देफ जो मुळात बरेच दिवस झाले इस्त्राईलच्या निशाण्यावर आहे त्याने काल विधान केले की आम्ही इस्त्राईल विरोधात नवीन लष्करी मोहीम आखत असुन या मोहीमेच नाव 'अल-अक्सा स्टाॅर्म' (Al-Aqsa Storm) असे आहे. तर हमासचा राजकीय नेता इस्माईल हनीयेहने याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलय. त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही आखलेली 'अल-अक्सा स्टाॅर्म' ही लष्करी मोहीम विचारपूर्वक सुरू केली असुन ही मोहीम इस्त्रायलकडुन अन्याय झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी आखली आहे. 'वेस्ट बॅंक' चा बळजबरीने घेतलेला ताबा, अल-अक्साच्या संरक्षणासाठी तिची मानहानी थांबवण्यासाठी 'अल-अक्सा फ्लड' चालु केलीय.
आता आपण 'अल-अक्सा' मशीदीबद्दल माहिती घेऊया..
ज्यु(यहुदी),इस्लाम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मातील लोकांच्या काळजाचा विषय असणार्या 'जेरूसलेम' शहरात 'अल-अक्सा' मशीद स्थित आहे. पण याआधीचा इतिहास जाणुन घेणं खुप गरजेच आहे..
यासाठी आपणास इसा मसिह यांच्या जन्माच्या आधीच्या टाईमलाईनमध्ये जाऊन ज्यु(यहुदी) लोकांचा इतिहास समजावा लागेल. इसाच्या(अरेबिक लोकं jesus Christ लाच इसा मसिह संबोधतात) जन्माच्या हजारो वर्षांपूर्वी यहुदी राजा 'सोलोमन' याने एक मंदीर बांधले होते ज्याला यहुदी 'प्रथम मंदीर'(first temple) संबोधायचे.
 पुढे जाऊन 'बेबीलोनियन' लोकांनी आक्रमणामध्ये 'first temple' नेस्तनाबूत केले. यानंतर जवळपास 500 वर्षांनंतर म्हणजेच इ.स.पु. 516 ला यहुदींनी पुन्हा एकदा याच जागेवर दुसरे मंदीर बांधले ज्याला 'द्वितीय मंदीर'(Second temple) म्हणुन ओळखले जायचे. याठिकाणी सर्व यहुदी एकत्र येऊन प्रार्थना करायचे. हे द्वितीय मंदीर जवळपास 600 वर्ष शाबुत राहिले. 
सन 70 मध्ये 'रोमन साम्राज्य'ने हमला करून हे मंदीर तोडण्याचा प्रयत्न केला पण या हमल्यात संपूर्ण मंदीर नष्ट झाले नाही तर 'पश्चिम' दिशेला मंदीराची एक भिंत शिल्लक राहिली. ही भिंत आजपण तिथे अस्तित्वात असुन यहुदी या भिंतीला 'वेस्टर्न वाॅल' किंवा 'वैलिंग वाॅल' म्हणतात. वैलिंगचा मराठी अर्थ 'रडणारी भिंत' असा आहे. आज यहुदी लोकांसाठी ही भिंत म्हणजे त्यांच्या धर्माची शेवटची निशाणी असुन ही लोकं एका कागदावर मनातील इच्छा लिहतात आणि भिंतीच्या भेगांमध्ये चिठ्ठ्या खोचुन ठेवतात. प्रार्थना करतात..
तर इस्लाम धर्मातील लोकांच्या मतानुसार सन 621 मध्ये याच जागेवरून शेवटचे पैगंबर मोहम्मद यांनी 'जन्नत' पर्यंत प्रवास केला होता..याच मशीदीमध्ये पैंगबरांनी त्यांच्या आधीच्या येऊन गेलेल्या सगळ्या पैगंबरांसोबत मिळुन 'नमाज' पठण केले होते. आणि आधी जगभरातील सगळे मुसलमान नमाज पठण करण्यासाठी याच मशीदीच्या दिशेने तोंड करून बसायचे पुढे जाऊन सगळे मक्कास्थित 'मश्जीद-अल-हरम'च्या दिशेने तोंड करून नमज पठण करायला लागले. यामुळेच तुमच्या पाहण्यात आले असेल भारतातील मुसलमान नमाज पठण करताना 'पश्चिम' दिशेला तोंड करून बसतात..
मोहंमद पैगंबर यांचे देहांत झाल्याच्या 4 वर्षांनंतर मुसलमानांनी पुन्हा जेरूसलेमवर हल्ला केला त्यावेळी तेथे 'बायजेंटाईन साम्राज्य' होते. त्यांना हरवुन 'वेस्टर्न वाॅल' अर्थात पवित्र भिंत, 'डोम ऑफ द राॅक(सुवर्ण गोलघुमट असणारी इमारत जिच्या बांधणीत बायजेंटीईन लोकांची कलाकृती दिसुन येते) व 'अल-अक्सा मशीद' हे तिन्ही इस्लाम लोकांच्या अधिकाराखाली आले.
आजच्याघडीला जवळपास 2 एकर परिसरात या तिन्ही गोष्टी एकत्र आहेत.
याच 2 एकर परिसरात ख्रिश्चन लोकांचे पवित्र चर्चदेखील स्थित असुन ख्रिश्चन लोकांच्या मान्यतेनुसार याच ठिकाणी येशु ख्रिस्तांना बळी चढवलेलं आणि बळी चढवल्याच्या 3 दिवसांनंतर याच ठिकाणी त्यांचा पुनर्जन्म झाला होता..
म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेलच की या दोन एकर परिसरात 3 धर्मांच्या भाव भावना एकत्रित नांदत आहेत पण या नांदण्यामागे काडीचीही शांतता नाहीय 😅..
याच वर्षी एप्रिल महिन्यात अल-अक्सा मशिदीत इस्त्राईल पोलिसांनी लाठीचार्ज आणि रबर बुलेट्सची फायरींग केली व बरेच लोकं जखमी झाले..
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे लोकं अशांतता पसरवण्यासाठी आले होते पण या घटनेमुळे आधीच नावाला खपली धरू पाहणार्या या शहरावर पुन्हा एकदा घाव झाला आणि जखमेतुन परत रक्त भळभळत वाहायला लागल..
तिन्ही धर्मांना एकत्र नांदण एव्हढ अवघड जात असताना आपल्या भारत देशात 'सर्वधर्मसमभाव' जपण्याचा जो प्रयत्न होतो तो खरच‌ कौतुकास्पद आहे..
आपल्या देशात तर हजारो जाती-भाषा एकत्र राहतात..काही समाजकंटकांना हे पाहवत नाही तो भाग वेगळा!!
ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा!!
अश्याच नवनवीन‌ गोष्टी जाणुन घेण्यासाठी मला ट्विटरवर(X) फोलोव करायला विसरू नका 

Twitter (X) id :- @mrutyyunjay (वसुसेन)


#Israel #Palestine #insiders #Hamas #AlAqsaStorm #AlAqsaFlood #IsraelPalestineWar #IronDome #Gaza

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नित्यानंद बाबाचा देश आणि अमेरिकेला चुना

भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा

चीनला कामाला लावणारा Ghost particle(Neutrino)