भारताचं जिगरबाज नेतृत्व रोहित शर्मा
संपल.. मागच्या दिड एक महिन्यापासून संपूर्ण देशात जो क्रिकेट सण साजरा होत होता त्याला आज पुर्णविराम लागला..भारतीय संघ खरच भारी खेळला, एकदम संतुलित वाटणारा हा संघ हार्दिक पांड्या जरी बाहेर गेला तरी आपलं संतुलन न जाऊन देता खेळला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उरलेल्या १० खेळाडुंनी आपला बेस्ट परफाॅर्मन्स दाखवला..देशातील १५० करोड लोकांना प्रत्येक सामन्यानंतर आनंदच आनंद दिला! वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत जादुई प्रवास करणारा भारत यंदाचा वर्ल्डकप मारणार अशी जणु गॅरंटीच होती. त्यात 'आपणच जिंकणार' हा विश्वास वाढवायला जुन्या थेअर्या चघळल्या जात होत्या ज्यात, १)२०११,२०१५,२०१९ ला वर्ल्डकप host करणारे देश जिंकले म्हणुन यावेळीही आपण जिंकणार. २)२०११,२०१५,२०१९ ला ज्या देशांनी रन चेज केले ते संघ जिंकले(भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विवादित) दुर्दैवाने भारताला यावेळी टाॅस जिंकता आला नाही आणि पहिली फलंदाजी करावी लागली. ३)२०११,२०१५ व २०१९ ला अंतिम सामन्यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांपैकी जो कर्णधार ट्राॅफीच्या उजव्या बाजुला उभारलाय तो संघ वर्ल्डकप जिंकलाय.यावेळी रोहित शर्मापण उजव्या...