पोस्ट्स

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मचं का स्विकारला?

इमेज
घटनेचे शिल्पकार आणि उच्चविद्याविभूषित डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन बर्याच चढ उतारांनी भरलेले होते..आज संपूर्ण जग बाबासाहेबांना 'महामानव' म्हणुन ओळखते..आपल्या शेवटच्या काळात त्यांनी धर्मपरिवर्तन करायचा निर्णय घेतला आणि तब्बल २० वर्ष सगळ्या प्रस्थापित धर्मांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यांनी त्यांच्या जवळपास ३ लाख ८० हजार अनुयायांसमवेत 'बौद्ध धर्म' स्विकारला.. पण बाबासाहेबांनी नेमका बौद्ध धर्मच का स्विकारला? बाकीच्या धर्मांबद्दल त्यांचे मत काय होते? याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.. बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्म स्विकारला परंतु हे करण्या पुर्वी त्यांनी जवळपास दोन दशकं सगळ्या धर्मांचा सखोल अभ्यास केला.बौद्ध धर्म निवडण्यामागे अनेक कथा असल्या तरी बाबासाहेबांनी 'बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य' ह्या निबंधात उत्तर दिले आहे.ह्या निबंधामध्ये त्यांनी जगातले ४ महत्त्वाचे धर्म आणि त्यांच्या प्रतिनिधींची तुलना केलीय.ते म्हणजे 'गौतम बुद्ध,येशु ख्रिस्त,मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण'. बाब...

इंदिरा गांधींना ब्रेक लावणारा 'केशवानंद भारती' खटला

इमेज
मित्रांनो विकेंडसाठी एक खास ब्लाॅग शेअर करत आहे..आजही कायदेतज्ञ, MPSC UPSC करणारे आणि बरेचजण ज्या खटल्याचा अभ्यास करतात..ज्या खटल्याने संविधानं वाचवल..असा खटला!! याचे नाव 'केशवानंद भारती विरूद्ध केरळ राज्य खटला'.. याच्याबद्दल थोडक्यात सांगायच म्हटल तर हा खटला भारताच्या इतिहासातील Milestone ठरला,या खटल्याच्या निकालासाठी जवळपास ७० देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला, खटल्याच्या शेवटी तब्बल ७०३ पानांचे निकालपत्र बनले होते आणि या खटल्याने सगळ्या देशाला अप्रत्यक्षपणे दाखवुन दिले की 'संविधानाच्या वर कोणतच सरकार नाही'...  केशवानंद भारतीच्या मनीध्यानी नसताना एका देवदुतामुळे ते रात्रीत(६८ दिवसात🙏) स्टार झाले. केशवानंद भारती खटल्याबद्दल जाणुन घेण्याआधी आपल्याला 'गोलकनाथ खटल्या'बद्दल थोडस जाणुन घ्याव लागेल.'केशवानंद भारती विरूद्ध केरळ राज्य'(१९७३) ह्या केसचा अप्रत्यक्ष पाया त्याच्या अगोदर होऊन गेलेल्या गोलकनाथ खटल्यामध्ये बांधला गेला होता(१९६७).गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सरकार मुलभूत हक्कांमध्ये घटनादुरुस्ती करू शकत नाही.ज...

विराट कोहली स्वार्थी का निस्वार्थी?

इमेज
आज विराटने ज्याप्रकारे त्याच 48 एकदिवसीय शतक पुर्ण केल ते पाहुन माझ्यासकट सगळेच बुचकाळ्यात पडलेत.. आणि मॅच संपल्यापासुन सगळीकडेच विराट कोहली स्वार्थी खेळला, विराट कोहली अगदी बरोबर खेळलाय, जी मॅच लवकर संपवता आली असती ती स्वतासाठी लांबवली आणि संघाच्या NRR ला कमी केलं किंवा रोहितमुळे विराटला एकदिवसीय सामन्यात कमी संधी मिळालीय(जुना विषय) या चर्चांना उधाण आल आहे. Anti Kohli आणि Pro Kohli अश्या दोन गटांमध्ये तुंबळ शाब्दिक हाणामारी चालु आहे. कोहलीला विरोध करणारे दुसर्या खेळाडुंचे समर्थक आहेत(खासकरून रोहित शर्माचे). याबाबत आपण थोडासा व्यवस्थित आढावा घ्यायचा प्रयत्न करूया.. तर विषय असा झाला की आज भारत विरुद्ध बांगलादेश मधील विश्वचषकीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या 256 धावा झाल्या. भारताने चेज करताना रोहित हिटमॅन शर्मा आणि शुभमन गीलने संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. आवडीचा पुल शाॅट मारण्याच्या नादात रोहित आऊट झाला आणि त्याचे अर्धशतक दुर्दैवाने २ धावांनी हुकलं तर गीलचं अर्धशतक पुर्ण झाल.. रोहित गेल्यावर मैदानावर किंग कोहलीचे आगमन झाले. आल्या आल्...

शेअर मार्केट expiry बद्दल थोडसं..

इमेज
शेअर मार्केटमध्ये सक्रीय असणार्यांना माहिती आहे की बरेच दिवस झाले आठवड्यातील ५ दिवस विविध expires असतात. 1)सोमवारी 'Nifty Midcap'. 2)मंगळवारी 'Nifty Financial Services' यालाच मार्केट करणारी 'Finnifty' म्हणुन ओळखतात. 3)बुधवारी लाडकी 'Bank nifty'  4)गुरूवारी 'Nifty' आणि  5)शुक्रवारी 'Sensex' ची expiry असते यामध्ये निफ्टी मिडकॅप ची lot size 75 , Finnifty ची lot size 40, bank nifty ची lot size 15, Nifty ची lot size 50 आणि sensex ची‌ lot size ही 10 आहे. बर्याच जणांच्या बर्याच कुठलं almost सगळ्यांच्याच नजरेत expiry म्हणजे 'Hero Zero' माल छापायचा दिवस!! Hero zero म्हणजे expiry दिवशी तुमच्या अगदी 150/200 रूपयांचे 2000/4000 रू. होतात पण एक गोष्ट लक्षात घ्या की याची शक्यता बरीच कमी असते. त्यामुळे तुम्ही Hero zero करत असताना एकतर घेतलेला contract Zero होऊन द्यायची तयारी ठेवावी जेणेकरून तस झालच तर तुम्हाला वाईट वाटणार नाही आणि तुम्ही सगळी रक्कम Hero Zero मध्ये न टाकता अशी रक्कम वापरा जी संपली तरी तुम्हाला ज्यादा फरक पडणार नाहीय. ...

मनोज जरांगे पाटील आणि राजकारण

इमेज
जरांगे पाटलांच्या मागे बहुसंख्येने #मराठा समाज उभा आहे हे संपूर्ण देशाने काल पाहिले. ऑक्टोबर हीट, पोटापाण्याचा प्रश्न, लांबचा प्रवास या सगळ्या गोष्टी अक्षरशः फाट्यावर मारत शेकडो किलोमीटर वरून ट्रकाच्या ट्रका भरून मराठ्यांनी गर्दी केली होती.. आपल्या समाज बांधवांकडुन मिळालेलं हे अनपेक्षित प्रेम आणि प्रतिसाद पाहुन जरांगे पाटलांनीही 'मी सावलीत उभारून बोलणार नाही. माझ्या डोक्यावरचा मंडप काढुन टाका' अस वक्तव्य केलं आणि आपणही आपल्या समाजातलाच असंख्यातला एक घटक आहे याचे उदाहरण दिले.. काल त्यांनी स्टेजवरून जी वक्तव्यं केली त्या प्रत्येकाला काहीतरी पार्श्वभूमी आहे.. त्यांचे आणि त्यांच्यासारख्या तमाम समाज बांधवांचं त्यामागे निरिक्षण आहे..अनुभव आहे! गुणा सदावर्ते उर्फ 'वेल्डर' नेमकं कोणाच पिल्लु आहे हे सगळ्या राज्याला चांगलच माहितीय.. जरांगेला उचला ती व्यक्ती हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करेल अश्या प्रकारची भाषा गुणाने वापरली खरी.. पण काल सभा आटोपुन माघारी जाताना प्रत्येक मराठ्याने पडलेला कचरा, बाटल्या उचलुन आणि नियमांचे पालन करत एकमेकांन...

तेंडल्या माऊंट एव्हरेस्ट एव्हढा

इमेज
मला तर विशेष सचिन तेंडुलकरचं वाटत राव! एक गोष्ट लक्षात घ्या..सुमार उंचीचा असणारा तेंडल्या ग्राऊंडवर हिमालयासारखा उत्तुंग होता अस का? 💪🔥👇 अफगाणिस्तान भारत सामन्याचं बघा.. रोहित शर्माने शतकं मारलं आणि सचिनचा वर्ल्डकपमध्ये असणार्या 6 शतकांचा रेकाॅर्ड मोडला तर सामन्याच्या शेवटी विराट कोहलीने अर्धशतकं मारलं आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना 50+ धावा मारण्याचा सचिन तेंडुलकरच्या 45 सामन्यांचा रेकाॅर्ड मोडुन टाकला. इकडे ग्राऊंडवर तुम्ही कामगिरी करा आणि तिकडे सचिनचे रेकाॅर्डच्या पुस्तकातुन एक एक रेकॉर्ड जगासमोर यायला चालु होतात 😅 Its totally shocking 🤯 सचिनचा वर्ल्डकपमधील आणखी एक रेकॉर्ड म्हणजे 20 सामन्यांमध्ये त्याने 1000 धावा पुर्ण केल्यात तर आज रोहितने 19 सामन्यांमध्ये 1000 धावा पुर्ण केल्या.. सचिनचे असे आणखी किती रेकाॅर्ड्स असतील हे कोणीच सांगु शकणार नाही 😅 बर सचिनची दुरदृष्टी पाहा! 29 मार्च 2012 म्हणजे तब्बल 11 वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जेव्हा सलमान खानने सचिनला विचारले," काय वाटत तुझा रेकाॅर्ड कोण मोडेल? का कोणीच मोडु शकणार नाही??"...

मराठा आंदोलन किस्सा BMW X1 चा

इमेज
खुप वेळ झाला हा फोटो सामाजिक माध्यमांवर फिरत आहे आणि बरेच जण म्हणतायत तुम्ही(मराठा जातीतले) जर इतक्या महागड्या गाड्या वापरत असाल तर मराठ्यांना कशाला पाहिजे आरक्षण? करोडोची गाडी वापरता आणि आरक्षण मागता... भावना बाजुला ठेवल्या आणि जर वेगळ्या दृष्टीने पाहिले तर असं लक्षात येईल की मुळात ही गाडी BMW कंपनीच्या X series मधली आहे. X1 माॅडेल असणारी ही गाडी Third owner म्हणजेच या गाडीचा हा तिसरा मालक आहे.. Second hand घ्यायला गेलं तर हीच गाडी 8-9 लाखांना मिळुन जाईल ही तर third owner आहे..म्हणजे साधारण 5-6 लाखांपर्यंत मालकाने ही विकत घेतली असेल! हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा पाहुया.. या गाडीच्या मालकाचे आडनाव 'भिडे' अस दाखवत आहे. इथ उपस्थितांपैकी कोणीतरी मला सांगावे की मराठा समाजात 'भिडे' आडनाव असत का?? मी स्वतः मराठा असलो तरी माझ्या ऐकण्यात-पाहण्यात भिडे आडनाव कधी आलेलं नाहीय ना ही त्या आडनावाची व्यक्ती 😅 असेल तर करेक्ट करा! आणि तिसरा मुद्दा.. गाडी कोणतीही असेना प्रत्येक समाजात जसे गरिब असतात त्याच प्रकारे गबरगंड श्रीमंत देखील असतातच! एखाद्या जातबांधवाने स्वत...